SRH | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा उंचावणार ट्रॉफी? आठ वर्षापूर्वीचे योगायोग पुन्हा आले जुळून

Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादने 2016 साली जेव्हा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते, त्यावेळी घडलेल्या काही घटनांमध्ये आणि यंदाच्या हंगामातील काही घटनांमध्ये साम्य दिसून आले आहे.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील प्लेऑफला मंगळवारपासून (21 मे) सुरु होणार आहे. क्वालिफायर वनचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात अहमदाबादला खेळवला जाणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामना गाठणार आहे. तसेच पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर टू खेळून अंतिम सामना गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

दरम्यान, प्लेऑफला सुरुवात होण्यापूर्वी सनरायझर्स हैदाराबाद संघाबाबात काही योगायोग समोर आले आहे. खरंतर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो, त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.

मात्र, सनरायझर्स हैदराबादने 2016 साली जेव्हा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते, त्यावेळी घडलेल्या काही घटनांमध्ये आणि यंदाच्या हंगामातील काही घटनांमध्ये साम्य दिसून आले आहे. या योगायोगांमुळे सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकतात असा कयास लावला जात आहे.

काय आहेत योगायोग?

साल 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सही प्लेऑफमध्ये होते. त्याप्रमाणे 2024 मध्येही हे तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

2016 साली हैदराबादने विजेतेपद मिळवण्याच्या आदल्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तसेच 2024 आयपीएल हंगामापूर्वीच्या आदल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.

साल 2016 आयपीएल प्लेऑफमध्ये एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू खेळले नव्हते. 2024 मध्येही या दोन्ही खेळाडूंच्या संघांना प्लेऑफमध्ये जागा मिळवता आलेला नाही.

2016 साली हैदराबादचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर नेतृत्व करत होता, 2024 मध्ये हैदराबादचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्स करत आहे.

इतकेच नाही तर 2016 साली हैदराबादकडून सर्वाधिक धावा डावखुरा सलामीवीर असलेल्या वॉर्नरने केल्या होत्या. 2024 मध्ये हैदराबादकडून आत्तापर्यंत सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर ट्रेविस हेडने केल्या आहेत.

एकूण हे योगायोग हैदराबाद 2024 मध्येही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतात हे सुचवत आहेत, आता खरंच हैदराबाद 2016 ची पुनरावृत्ती करत विजेतेपद जिंकणार का हे पाहावे लागेल.

हैदराबादची कामगिरी

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादने शानदार कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 स्पर्धेच्या साखळी फेरीत 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत, तसेच 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे, तर एक सामना 1 अनिर्णत राहिला. त्यामुळे त्यांनी 17 पाँइंट्ससह दुसरा क्रमांक मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT