South Africa Captain Dean Elgar Warning Who Play IPL  ESAKAL
IPL

द. आफ्रिकेचा कर्णधार एल्गरचा IPL खेळणाऱ्या खेळाडूंविरूद्ध 'एल्गार'

अनिरुद्ध संकपाळ

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेने (South Africa Cricket Team) नुकतेच बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका 2 - 0 अशी जिंकली. मात्र दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेपूर्वीच्या वनडे मालिकेत बांगलादेशकडून मायदेशात पराभव सहन करावा लागला. दरम्यान कसोटी मालिकेतील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) एक मोठी घोषणा केली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या आयपीएल (IPL) खेळणाऱ्या खेळाडूंना इशारा दिला.

डीन एल्गर म्हणाला की 'मला माहिती नाही की ते खेळाडू बांगलादेशविरूद्धची मालिका न खेळता आयपीएल खेळणरे) पुन्हा संघात निवडले जातील का नाही. आता हे आमच्या हातात राहिले नाही.' दक्षिण आफ्रिकेच्या बऱ्याच खेळाडूंनी बांगलादेश विरूद्धची मालिका खेळण्याऐवजी आयपीएल खेळणे पसंत केले. यात कसिगो रबाडा (Kagiso Rabada) मार्को जेनसेन (Marco Jansen), लुंगी निगिडी (Lungi Ngidi), एनरिच नॉर्तजे (Anrich Nortje), रासी वॅन डेर ड्युसेन (Rassie van der Dussen) आणि एडिन मारक्रम (Aiden Markram) यांनी आयपीएल खेळण्याला पसंती दिली. त्यांनी बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका खेळणे टाळले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापन खूष नाही. विशेष म्हणजे संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचरने देखील कर्णधाराची री ओढली आहे. तो म्हणाला की, 'त्यांनी आयपीएलमध्ये जाऊन संघातील आपली जागा रिकामी केली आहे.'

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश विरूद्धचे दोन्ही कसोटी सामने आरामात जिंकले. जरी त्यांच्या संघातील रथी महारथी आयपीएलमध्ये पैसे छापत असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मात्र कसोटी मालिकेपूर्वी झालेली वनडे मालिका बांगलादेशने जिंकली होती. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत पहिलीच वनडे मालिका जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT