India Women Cricket Team Sakal
IPL

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

India Women vs South Africa Women: दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

South Africa Women Cricket team tour of India: भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ जून २०२४ मध्ये येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये तीन वनडे, एक कसोटी आणि तीन टी20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

या दौऱ्याला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा 9 जुलै रोजी संपेल. 13 जूनला बेंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका संघ सराव सामना खेळेल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आधी 16 जूनपासून वनडे मालिका होईल, तर नंतर एकमेव कसोटी सामना खेळवला जाईल आणि शेवटी टी20 मालिका होईल.

वनडे मालिका बेंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे, तर कसोटी आणि टी20 मालिका चेन्नईमध्ये खेळली जाणार आहे. तसेच गेल्या सात महिन्यातील भारतीय महिला संघाचा हा तिसरा कसोटी सामना असणार आहे. तसेच हा कसोटी सामना चार दिवसीय असणार आहे.

भारतीय महिला संघाने डिसेंबर 2023 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक-एक कसोटी सामना खेळला होता.

दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा -

वनडे मालिका -

16 जून - पहिला वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

19 जून - दुसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

23 जून - तिसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

कसोटी सामना -

28 जून ते 1 जुलै - एकमेव कसोटी सामना, चेन्नई (वेळ - स. 9.30 वाजता)

टी20 मालिका

5 जुलै - पहिला टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

7 जुलै - दुसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

9 जुलै - तिसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT