Kavya Maran | SRH Sakal
IPL

Kavya Maran: 'तुमचा अभिमान वाटतोय', पराभवानंतरही काव्या मारनने जिंकलं मन; SRH च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल

SRH Kavya Maran Video: आयपीएल 2024 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर निराश झालेल्या सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंना दिलासा देणारं भाषण सीईओ काव्या मारनने ड्रेसिंग रुममध्ये केले.

Pranali Kodre

SRH CEO Kavya Maran Video: कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे रविवारी (26 मे) विजेतेपद पटकावले. कोलकाताने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत केले, त्यामुळे हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या पराभवानंतर हैदराबादचा संघ निराश झाला होता. पण असे असले तरी संघाची सहसंघमालकीण आणि सीईओ काव्या मारनने संघाचे मनोबल वाढवत त्यांचे कौतुक केले आहे.

तिने म्हटले की 'टी20 क्रिकेटला तुम्ही नवी ओळख मिळवून दिली.' हा व्हिडिओ हैदराबादने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काव्या हैदराबाद संघ पराभूत झाला असताना अत्यंत निराश झाली होती. पण तिने ही निराशा लपवत संघाचे कौतुक केले होते. ती ड्रेसिंग रुममध्ये म्हणाली, 'तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे. मी इथे हे सांगायला आली आहे की आपण ज्याप्रकारे क्रिकेट खेळलो, त्याने आपण टी20 ला एक नवी ओळख मिळवून दिली. सर्वजण त्याबद्दल बोलत आहेत.'

'एखादा दिवस वाईट असतो आणि तो आज होता. पण खरंच तुम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी, सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केली. जरी आपण गेल्यावर्षी पाँइंट्स टेबलमध्ये शेवटी राहिलो असलो, तरी यावेळी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक चाहते आले, कारण तुमच्यातील क्षमता होती.'

'जरी कोलकाता जिंकले असले तरी आपण ज्याप्रकारे क्रिकेट खेळलो, त्याबद्दल सर्वजण बोलत आहेत. काळजी घ्या आणि थँक्यू. निराश होऊ नका आपण अंतिम सामना खेळलोय. सर्व संघ आपल्याला पाहात होते.'

काव्या नेहमीच हैदराबादला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसते. संघाच्या कामगिरीमुळे तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे भावही अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात.

दरम्यान, अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात सर्वबाद 113 धावाच केल्या. त्यानंतर 114 धावांचे लक्ष्य कोलकाताने 10.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT