srh vs lsg ipl 2024 SAKAL
IPL

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद - लखनौ सुपर जायंटस्‌ या दोन तुल्यबळ संघांमध्ये आज आयपीएल साखळी फेरीची लढत रंगणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद - लखनौ सुपर जायंटस्‌ या दोन तुल्यबळ संघांमध्ये आज आयपीएल साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी अकरा सामन्यांमधून सहा सामन्यांमध्ये विजय संपादन केले असून पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्‍यक आहे. हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर लखनौचा सामना करणार आहे.

हैदराबादच्या संघाला मागील चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फलंदाजांप्रमाणे त्यांना गोलंदाजीतही अपयश आले आहे. ट्रॅव्हिस हेडचा अपवाद वगळता हैदराबादच्या फलंदाजांकडून निराशा झाली आहे. अभिषेक शर्मा याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे; पण मागील चारपैकी फक्त एका सामन्यात त्याला ३०च्या वर धावा करता आल्या आहेत.

मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी यांनी या वेळी मत व्यक्त करताना म्हटले की, प्रत्येक सामन्यात सलामीवीरांनी धावा करायला हव्यात, असे होऊ शकत नाही. मधल्या फळीकडूनही धावा व्हायला हव्यात. हेनरिक क्लासेन व नितीशकुमार रेड्डी या मधल्या फळीतील फलंदाजांकडून सातत्याने धावा करण्यात आलेल्या नाहीत. याचा फटकाही हैदराबादला बसत आहे.

हैदराबादचा गोलंदाजी विभाग पूर्णपणे कर्णधार पॅट कमिन्सच्या खांद्यावर अवलंबून आहे. टी. नटराजन प्रभावी कामगिरी करीत आहे; पण सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी त्याच्याकडून अद्याप झालेली नाही. भुवनेश्‍वरकुमारला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मार्को यान्सेन, जयदेव उनाडकट यांच्याकडूनही सपशेल निराशा झालेली आहे.

फलंदाजांनी खेळ उंचावण्याची गरज

कोलकता संघाकडून लखनौला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. या धक्क्यातून बाहेर येत लखनौला आता हैदराबादचा सामना करावयाचा आहे. कर्णधार के. एल. राहुल, निकोलस पूरन व मार्कस स्टॉयनिस या प्रमुख फलंदाजांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. आयुष बदोनी या भारतीय खेळाडूला या मोसमात सूर गवसलेला नाही. लखनौसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

भारतीय गोलंदाजांवर मदार

युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव याने कमी लढतींमध्ये ठसा उमटवला आहे; पण दुखापतीमुळे आता त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. मोहसिन खान यालाही दुखापत झाली आहे. त्यामुळे आता यश ठाकूर, कृणाल पंड्या व रवी बिश्‍नोई या भारतीय गोलंदाजांवर लखनौच्या गोलंदाजीची मदार असणार आहे. या सर्वांना हैदराबादच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT