srh-vs-rcb-playing-11-ipl-2023-today-match-dream11-sunrisers-hyderabad-vs-royal-challengers-bangalore 
IPL

IPL 2023 SRH vs RCB : दिनेश कार्तिक बाहेर? बंगळुरूच्या संघात मोठा बदल; अशी असू शकते Playing-11

हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे पण आरसीबीसाठी...

Kiran Mahanavar

IPL 2023 SRH vs RCB Playing-11 : सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे, पण आरसीबीसाठी त्याचे उर्वरित दोन्ही सामने खूप महत्त्वाचे आहेत. आरसीबी सध्या 12 सामन्यांत 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आरसीबीने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मोठ्या फरकाने पराभव केला होता, त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वानिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड यांच्या दुखापतीमुळे मायकेल ब्रेसवेल आणि वेन पारनेल यांना गेल्या सामन्यात संधी दिली होती. हसरंगा आणि हेजवूड यांच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतेही अपडेट मिळालेले नाही. मात्र, हसरंगा तंदुरुस्त असेल तर तो खेळणार हे नक्की. याशिवाय दिनेश खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि संघ त्याच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि केदार जाधव यांच्यापैकी कोणीही संधी दिल्या जाऊ शकते.

या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ काही बदल करण्याचा विचार करू शकतो. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माला बेंचवर बसावे लागू शकते, त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळू शकते. त्याचवेळी उमरान मलिकचे पुनरागमन होऊ शकते. हॅरी ब्रूक देखील परत येऊ शकतो.

RCB संभाव्य प्लेइंग इलेव्हन - विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, मायकेल ब्रेसवेल, कर्ण शर्मा, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल.

SRH संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स/हॅरी ब्रूक, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक जैन/फारूक .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT