Suhana Khan Reaction on Ishan Kishan 
IPL

IPL 2023: इशान किशनच्या फलंदाजीने हैराण सुहाना खान; आऊट होताच केले असे कृत्य...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुखच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने....

Kiran Mahanavar

IPL 2023 Suhana Khan Reaction on Ishan Kishan : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान सुहाना खान संघाला चिअर करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होती. या सामन्यात केकेआरचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला.

व्यंकटेश अय्यरने कोलकात्यासाठी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि सुहाना सेलिब्रेशन करताना दिसली. मात्र बॉलिवूडचा बादशाह शाहरुखच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने मुंबई इंडियन्सच्या इशान किशनला बाद केल्याबद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

इशान किशनने केवळ 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याच्या फलंदाजी कडे बघून असे वाटत होते की तो आणखी काही काळ थांबला तर 12-15 षटकांत कोलकाता हरली असती. ईशानने 25 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर 8व्या षटकात तो बाद झाला. त्यावेळी कॅमेरा सुहाना खानकडे गेला. ती स्टँडमध्ये उभी राहून काहीतरी चावत होती. त्याने लगेच दोन शब्द वापरले. सोशल मीडियावर दावा केला जात आहे ते इथे लिहिता येणार नाही. क्लिपमध्ये सुहानाचा धाकटा भाऊ अबराम खान तिच्यासोबत बसलेला दिसत होता.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव करून स्पर्धेत सलग दूसरा विजय नोंदवला आहे. त्याचवेळी कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 185 धावा केल्या. मुंबईने 14 चेंडू बाकी असताना पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT