kl rahul century in 100th ipl 2022  sakal
IPL

IPL 2022: केएल राहुलचे शतक अन् आथिया, सुनील शेट्टी जाम खूष; पोस्ट व्हायरल

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याच्या या शानदार खेळीवरील पोस्ट केले आहे

Kiran Mahanavar

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) केएल राहुलने शनिवारी 100 वा सामना खेळाला. राहुलने तो आणखी खास बनवला आहे. राहुलने १००व्या आयपीएल सामन्यात शतक ठोकले आहे. १००व्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याच्या या शानदार खेळीवरील पोस्ट केले आहे. पोस्ट आता तरी चांगलीच व्हायरल होत आहे. राहुल आणि अथिया शेट्टी बर्‍याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर अनेकदा एकत्र फोटो शेअर केले आहे.(Suniel Shetty Post KL Rahul News)

सुनील शेट्टीने राहुलसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शांततेत कठोर कष्ट करा आणि तुमच्या यशाचा आवाज झाला पाहिजे. राहुल आपले दोन्ही कान बंद करून शतक साजरे केले आहे. राहुलने भूतकाळातील बाहेरचा आवाज थांबवण्यासाठी असे सेलिब्रेशन केले आहे.

सामन्याबद्दल बोलायच झाल तर केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 4 गडी बाद 199 धावा केल्या होत्या, आणि प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 20 षटकात 9 गडी गमावून 181 धावाच करू शकला. सामन्याचा सामनावीर राहुल ठरला. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत. आठ गुणांसह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT