Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore  esakal
IPL

SRH vs RCB : विराटचे शतक आरसीबीने हैदराबादचा शेवटच्या षटकात पराभव करत प्ले ऑफचे स्वप्न ठेवले जिवंत

अनिरुद्ध संकपाळ

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore : सनराईजर्स हैदराबादच्या हेन्रिच क्लासेनने शतकी खेळी करत आरसीबसमोर 187 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र क्लासेनच्या या शतकाला विराट कोहलीने देखील शतकी उत्तर दिले. विराट कोहलीने 63 चेंडूत शतक ठोकले. या शतकी जोरावर आरसीबीने हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 19.2 षटकात दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिसने 71 धावांची खेळी केली. या दोघांनी 172 धावांची दमदार सलामी दिली.

विराटचे जबर स्ट्राईक रेट

फाफ ड्युप्लेसिसने विराटच्या मागू येत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ विराट कोहलीने देखील 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर विराट - फाफच्या जोडीने शतकी भागीदारी देखील पूर्ण केली. मात्र आता आरसीबीला धावगती वाढवण्याची गरज होती. स्ट्राईक रेटवरून टीका होणाऱ्या विराटने याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 12 व्या षटकातनंतर तुफान फटकेबाजी करत बघता बघता आरसीबीला दीडशतकी मजल मारून दिली. हैदराबादला आरसीबीची सलामी जोडीच फोडण्यात यश येत नव्हते.

आता सामना 15 चेंडूत 20 धावा असा असताना षटकार मारत विराटे आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आजच्या सामन्यात आयपीएलमधील आपले सहावे शतक ठोकले. मात्र पुढच्याच चेंडूवर विराट कोहली 63 चेंडूत शतक ठोकून बाद झाला. विराटच्या षटकारामुळे सामना 12 चेंडूत 15 धावा असा आला होता.

दुसऱ्या बाजूने 45 चेंडूत नाबाद 67 धावांवर खेळणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसने टी नटराजनला चौकार मारत सामना 10 चेंडूत 10 धावा असा आणला. मात्र तो पुढच्याच चेंडूवर 71 धावांवर बाद झाला. नटराजनने सामना 7 चेंडूत 7 धावा असा आणला होता. मात्र मॅक्सवेलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना 6 चेंडू 3 धावा असा आणला.

विराट - फाफ ड्युप्लेसिसचा तडाखा

सनराईजर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 187 धावांचे आव्हान पार करताना आरसीबीची सलामी जोडी विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी तडाखेबाज सुरूवात केली. त्यांनी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत 6 षटकात नाबाद 65 धावा ठोकल्या. विराट कोहलीने चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत दमदार सुरूवात केली. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिसने आपला गिअर बदलला.

क्लासेनचे क्लासिक शतक 

मात्र कर्णधार एडिन माक्ररमने क्लासेनची साथ लगेचच सोडली. तो 18 धावा करून बाद झाला. मात्र तोपर्यंत क्लासेनने आपला दांडपट्टा सुरू करून डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. माक्ररम बाद झाला त्यावेळी हैदराबादच्या 104 धावा झाल्या होत्या. त्यानंतर क्लासेनने हॅरी ब्रुकच्या साथीने संघाला 178 धावांपर्यंत पोहचवले. त्याने ब्रुकसोबत 74 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यात त्याचा 47 धावांचा वाटा होता.

क्लासेनने चौथ्या क्रमांकावर येत शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. मात्र संघाच्या 178 धावा झाल्या असताना तो 104 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि ब्रुकने हैदराबादला 186 धावांपर्यंत पोहचवले.

संथ सुरूवातीनंतर हैदराबादने पकडला वेग

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पहिल्या दोन षटकात हैदराबादच्या सलामीवीरांना चांगलेच बांधून ठवले. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेसवेलने पाचव्या षटकात आधी अभिषेक शर्माला 11 धावांवर त्यानंतर राहुल त्रिपाठीला 15 धावांवर बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले.

या दोन धक्क्यानंतर हेन्री क्लासेन आणि कर्णधार एडिन माक्ररमने हैदराबादचा डाव सावरला. माक्ररम सावध फलंदाजी करत भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याला क्लासेनने आक्रमक फटकेबाजी करत चांगली साथ दिली. यामुळे हैदराबादने 10 षटकात 81 धावांपर्यंत मजल मारली. यात क्लासेनच्या 40 धावांचा वाटा होता.

आरसीबीने नाणेफेक जिंकली

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT