IPL 2024 Suryakumar Yadav  sakal
IPL

IPL 2024 Suryakumar Yadav : सूर्यकुमार आला रे... पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा!

सूर्यकुमार मुंबई संघात दाखल! रविवारच्या लढतीसाठी सराव सुरू ,पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव तंदुरुस्त होऊन संघात दाखल झाला आणि शुक्रवारी त्याने जोरदार सरावही केला.

अगोदर गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतर स्पोर्टस हार्निया अशा दुखापती झालेला सूर्यकुमार गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आता रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध होणाऱ्या सामन्याद्वारे तो पुनरागमन करेल.

सूर्यकुमार हा आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला फलंदाज आहे. त्यामुळे त्याची उणीव भासणे स्वाभाविक आहे. वानखेडे स्टेडियमवर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी ढेपाळत असताना सूर्यकुमारची उणीव भासत होती.

गत आयपीएलमध्येही सूर्यकुमार सुरुवातीचे काही सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यंदा तिन्ही सामने गमावल्यामुळे मुंबईचा संघ तळाच्या दहाव्या स्थानावर आहे, तर दिल्लीचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

व्हायरल होण्यासाठी काहीही? भारती सिंग सांगितल्या विनोदाच्या मर्यादा, म्हणाली...‘माझी आईसुद्धा पाहणार...’

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Petrol-Diesel: कच्चे तेल महागल्याने पाकिस्तानात 'लॉकडाऊन'चा विचार! भारतात पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय?

SCROLL FOR NEXT