Suryakumar Yadav Supla Shot X/MIPaltan
IPL

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Suryakumar Yadav Supla Shot: सूर्यकुमार यादवचा 'सूपला शॉट' हा ट्रेडमार्क शॉट असून त्याने तो कसा खेळायचा हे डेवाल्ड ब्रेविसलाही शिकवला आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians Vide: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेतील 51 वा सामना शुक्रवारी (3 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने डेवाल्ड ब्रेविसला सूपला शॉट कसा खेळायचा शिकवला आहे.

खरंतर भारताचा 'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमारचा सूपला शॉट हा ट्रेडमार्क बनला आहे. साधारण स्कूप शॉट सारखा असलेल्या हा शॉट बऱ्याचदा सूर्यकुमार खेळतो. आता त्याने हा शॉट कसा खेळला जातो, हे 'बेबी एबी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसला शिकवला असून त्याचा व्हिडिओही मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की मुंबई इंडियन्सचा संघ नेट्समध्ये सराव करत आहे. यावेळी सूर्यकुमार ब्रेविसला या शॉटचे काही बारकावे समजावून सांगत आहे. तो असेही सांगतो की 10 पैकी 3 वेळाच बॅटवर चेंडू योग्यप्रकारे येईल, तर 7 वेळा कदाचीत येणार नाही. त्यानंतर ब्रेविसही हा शॉट खेळण्याचा सराव करताना दिसला आहे.

दरम्यान, यंदाचा हंगाम पाचवेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्ससाठी फारसा खास ठरलेला नाही. मुंबईने 10 पैकी 3 सामन्यांतच विजय मिळवला आहे, तर ७ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे सध्या 6 गुणांसह मुंबई 9 व्या क्रमांकावर आहे.

तसेच सूर्यकुमारचीही संमिश्र कामगिरी राहिली आहे. तो सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता. पण पुनरागमन केल्यानंतर त्याला अद्याप फारशी छाप पाडता आलेली नाही. त्याने 7 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 176 धावा केल्या आहेत.

डेवाल्ड ब्रेविसबद्दल सांगायचे झाले, तर त्याला यंदाच्या हंगामात दोनच सामन्यात संधी मिळाली आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 46 धावांची खेळी केली होती, तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यांत शून्यावर बाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Latest Marathi News Live Update: ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभाही गाजणार

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

SCROLL FOR NEXT