Riyan Parag
Riyan Parag  esakal
IPL

Riyan Parag RR vs DC : मी याला NCA मध्ये पाहिलं होतं.... सूर्याने रियानबाबत आधीच दिला होता इशारा

अनिरुद्ध संकपाळ

Riyan Parag RR vs DC : रियान पराग हा आयपीएलमध्ये गेल्या 6 वर्षापासून खेळतोय. मात्र राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूची प्रत्येक हंगामात खराब कामगिरीमुळेच चर्चा व्हायची. मात्र 2024 चा आयपीएल हंगाम हा रियानची ही स्टोरी बदलणारा हंगाम ठरण्याची शक्यता आहे. राजस्थानकडून आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत रियान पराग 2.0 ची झलक दाखवून दिली.

रियानच्या गुणवत्तेवर राजस्थानला कधीच शंका नव्हती. मात्र ही गुणवत्ता बाहेर येण्यासाठी तब्बल 6 वर्षे वाट पहावी लागली. 22 वर्षाचा रियान हा आयपीएलमध्ये 2019 पासून खेळतोय. त्याचं नाव भारताच्या सर्वात प्रतिभावान युवा खेळाडूंमध्ये घेतलं जातं.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यानं गेल्या दोन वर्षापासून धावांचा नुसता पाऊस पाडला आहे. मात्र आयपीएल आलं की त्याच्या बॅटला जणू ग्रहणच लागतं. त्याने राजस्थानकडून 18 ची सरासरी आणि 127 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.

मात्र रियान परागने 2024 मध्ये ही स्टोरी बदलण्याचा चंग बांधला आहे. त्याने हंगामातील पहिल्या सामन्यात 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात त्याने आयपीएल कारकीर्दीतील चौथे अर्धशतक ठोकले. राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला आजच्या सामन्यात 30 धावांच्या वर धावा करता आलेल्या नाहीत. रियाने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

या खेळीनंतर सूर्यकुमार यादवने रियानसाठी एक ट्विट केले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'काही आठवड्यापूर्वी मी या व्यक्तीला एनसीएमध्ये भेटलो होतो. त्याला छोटी दुखापत होती. त्याने आपल्या रिकव्हरीवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. तो खूप शिस्तीने आपले वर्कआऊटचे वेळापत्रक पाळत होता. मी एका प्रशिक्षकाला बोललो देखील होतो की हा मुलगा बदलला आहे. मी नक्कीच चुकीचा नव्हतो. रियान पराग 2.0'

रियान परागने आपल्या 84 धावांच्या नाबाद खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले होते. त्याने शेवटच्या 21 चेंडूत 60 धावा ठोकल्या. त्यामुळे राजस्थानची अवस्था 7.2 षटकात 3 बाद 36 धावा अशी होती. तेथून संघाने 20 षटकात 185 धावा केल्या. रियानने नॉर्त्जेच्या शेवटच्या षटकात तब्बल 25 धावा चोपल्या होत्या. नॉर्त्जे हा दक्षिण आफ्रिकेचा सध्याच्या घडीचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT