Suryakumar Yadav  
IPL

Suryakumar Yadav : लाईव्ह मॅचदरम्यान सुर्यकुमार यादवचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या कॅच आऊट झाला अन्...

धनश्री ओतारी

आयपीएल 2023 मध्ये 42 व्या सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेला होता. दरम्यान, सामन्यातील अनेक क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच सुर्यकुमार यादवचा एका धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. (Suryakumar Yadav uses abusive words after being dismissed off a brilliant catch video goes viral )

राजस्थानने मुंबई इंडियन्सला 20 ओव्हरमध्ये 212 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्ससमोर अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची आवश्‍यकता असताना टीम डेव्हिडने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूंवर तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ६ विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

या सामन्यादरम्यान एक घटना घडली ज्यामध्ये सुर्यकुमार यादव शिवीगाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजस्थानविरुद्ध सूर्याने विस्फोटक खेळी केली. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या कॅच आऊट झाला. राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं यादवचा शानदार झेल घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मात्र, या कॅचनंतर सूर्यकुमार यादव रागाने काहीतरी पुटपुटताना दिसला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सूर्याच्या चेहऱ्यावर नाराज स्पष्ट दिसत होती. सूर्याने रागाच्या भरात शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

8 सामन्यात 4 विजयासह मुंबई इंडियन्स 7 व्या क्रमांकावर पोहचली आहे. तर राजस्थानच्या संघाची घसरगुंडी झाली आहे. सध्या गुजरात टायटन्स 8 सामन्यातील 6 विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT