Mohmamd Nabi 
IPL

IPLच्या प्रसारणाला अफगाणिस्तानात बंदी; तालिबान सरकारचा निर्णय

रविवारपासून युएईमध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : यंदाच्या IPLच्या १४ हंगामाला सुरुवात झाली आहे. पण अफगाणिस्तानातील नागरिक ही क्रिकेट स्पर्धा पाहू शकणार नाहीत. कारण तिथं नव्यानं स्थापन झालेल्या तालिबान सरकारनं यावर बंदी घातली आहे. यंदाच्या IPLमध्ये रशीद खान, मोहम्मद नाबी आणि मुजिब उर रहमान हे अफगाणिस्तानचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

IPL 2021 ला युएईमध्ये रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे, हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर एम. इब्राहिम मोहम्मद यांनी ट्विट करुन सांगितलं की, या स्पर्धेत इस्लामविरोधी गोष्टी असल्यानं अफगाणिस्तानात IPLवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुलींनी डान्स करणे तसेच मोकळे केस सोडलेल्या महिला असं दृश्य इस्लामिक एमिरेट्स ऑफ तालिबानमध्ये बंदी आहे.

गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानचे नवे क्रीडा प्रमुख म्हणाले होते की, "तालिबानशासित अफगाणिस्तानात ४०० खेळ प्रकारांना परवानगी देण्यात येईल. पण या खेळांमध्ये एकाही महिलेला सहभागी होता येणार नाही, अन्यथा त्या क्रीडा प्रकारावर बंदी आणण्यात येईल. महिलांबाबत आता अधिक प्रश्न विचारु नका"

तालिबानच्या १९९६ ते २००१ या राजवटीत महिलांना कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती. तर पुरुषांच्या क्रीडा प्रकारांवर कडक नियंत्रण होतं. त्याचबरोबर महिलांना काम करण्यास आणि शिक्षण घेण्यातही बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा तालिबान सत्तेत आल्यानंतर इथल्या अनेक महिलांना आणि महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या जगातील कार्यकर्त्यांना पुन्हा ही धोरणं लागू होण्याची भीती वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT