SRH vs MI  Esakal
IPL

SRH vs MI : तिलकचे तडाखे तर ग्रीनचे दमदार अर्धशतक, मुंबईने हैदराबादसमोर ठेवले तगडे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

SRH vs MI : मुंबईने हैदराबादविरूद्ध प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 16 चेंडूत 37 धावा चोपत स्ट्राईक रेट वाढवून दिला. हैदराबादकडून जेनसेनने 2 फलंदाज बद कले. मुंबईकडून इशान किशनने 38 तर रोहित शर्माने 28 धावांचे योगदान दिले.

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आक्रमक सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र नटराजनने रोहित शर्माला 28 धावांवर बाद केले.

रोहित बाद झाल्यावर इशान किशन आणि कॅमरून ग्रीन यांनी 46 धावांची भागीदारी रचत मुंबईला 87 धावांपर्यंत पोहचवले. मात्र मार्को जेनसेनने इशान किशनला 38 तर सूर्यकुमार यादवला 7 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 3 बाद 95 अशी केली.

यानंतर ग्रीनला साथ देण्यासाठी आलेल्या तिलक वर्माने हैदराबादला तडाखे देण्यास सुरूवात केली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करण्यास सुरूवात केली. दुसरीकडे ग्रीन सावध फलंदाजी करत होता. या दोघांनी मुंबईला 17 व्या षटकात 150 पार पोहचवले. मात्र 16 चेंडूत 37 धावा केल्यानंतर तिलक वर्मा भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यानंतर ग्रीनने आपला गिअर बदलला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत 20 व्या षटकात मुंबईला 190 धावांचा पुढे नेले. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. त्याला टीम डेव्हिडने 11 चेंडूत 16 धावा करत चांगली साथ दिली. अखेर मुंबईने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या. ग्रीनने 40 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT