tilak varma not selected team india
tilak varma not selected team india  
IPL

रोहित शर्माच्या या जोडीदाराला टीम इंडिया मध्ये 'नो एंट्री'

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी एका 19 वर्षांचा खेळाडूने चांगला खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात या खेळाडूने आपल्या सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. आगामी काळात हा खेळाडू टीम इंडियाचा स्टार असल्याचेही मानले जात आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 22 मे ला बीसीसीआयने 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला. त्यामध्ये 19 वर्षीय युवा फलंदाज तिलक वर्माच्या नावाचा समावेश नव्हता. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी टिळक वर्माने महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहे. परंतु निवडकर्त्यांचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही. (tilak varma not selected team india squad south africa t20 series)

आयपीएलमध्ये नुकत्याच एका मुलाखतीत रोहित शर्माने सांगितले होते की, टीम इंडियासाठी टिळक वर्मा तिन्ही फॉरमॅट खेळू शकतो. रोहितच्या या विधानावर सुनील गावसकर म्हणाले होते, अगदी बरोबर आहे. त्याला आता फक्त थोडे कष्ट करणे, फिटनेस सुधारणे आणि रोहितला योग्य सिद्ध करणे त्याचावर आहे.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा टिळक वर्मा दुसरा खेळाडू आहे. टिळक वर्मानेआयपीएलच्या 12 सामन्यांमध्ये 40.89 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत. यामध्ये न 2 अर्धशतकेही केले आहेत. माजी खेळाडू आणि महान फिरकीपटू हरभजन सिंगनेही टिळक वर्माबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. हरभजन सिंग एका इव्हेंटमध्ये म्हणाला होता की, डेवाल्ड ब्रेविस आणि टिळक वर्माने या हंगामात त्यांच्या टॅलेंटची झलक दाखवली आहे. आता पुढील 10 वर्षांसाठी मुंबईची जर्सी दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

HSC Result: बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

SCROLL FOR NEXT