Tim David  Sakal
IPL

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Tim David: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज टीम डेविडच्या एका शॉटने स्टेडियममधील एक चाहता जखमी झाला.

Pranali Kodre

DC vs MI: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (27 एप्रिल) खेळवला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान एक प्रेक्षक जखमी झाला.

झाले असे की दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी 258 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 13 व्या षटकात 140 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर टीम डेविड 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्यानंतर त्याने त्याचा चौथाच चेंडू खेळताना षटकार ठोकला.

डेविड हा षटकार खलील अहमदने गोलंदाजी केलेल्या 14 व्या षटकात पाचव्या चेंडूवर ठोकला. मात्र, त्याच्या या षटकाराचा चेंडू थेट स्टँडमध्ये गेला. यावेळी तो चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर तो चेंडू जाऊन आदळला.

त्यामुळे वेगात आलेल्या या चेंडूमुळे तो प्रेक्षक जखमी झाला. यावेळी लगेचच त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी लगेचच त्याची विचारपूस केली. त्यानंतर काही मैदानातील कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी स्टँडमधून बाहेर नेले. दरम्यान, नंतरही डेविडने काही मोठे शॉट्स खेळले. तथापि, तो प्रेक्षक किती गंभीर जखमी झाला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिल्ली संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

दिल्लीकडून सुरुवातीला जॅक फ्रेझर-मॅकगर्कने आक्रमक खेळ केला. त्याने 27 चेंडूत 84 धावांची खेळी केली. तसेच शाय होपने 17 चेंडूत 41 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने 20 षटकात 4 बाद 257 धावा केल्या.

मुंबईकडून मोहम्मद नबी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्युक वूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT