Travis Head Century | IPL 2024 Sakal
IPL

Travis Head IPL Century: बेंगळुरूत घोंगावलं हेडचं वादळ! चौकार-षटकारांची बरसात करत झळकावलं सर्वात वेगवान शतक

IPL 2024, RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ट्रेविस हेडने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध चौकार-षटकारांची बरसात करत शतक केले. त्याचे हे शतक रेकॉर्डब्रेक ठरले आहे.

Pranali Kodre

Travis Head IPL Century: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 30 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. सोमवारी (15 एप्रिल) होत असलेल्या या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर ट्रेविस हेडने तुफानी शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने नवा विक्रमही केला आहे.

या सामन्यात बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजीसाठी उतरले. हैदराबादकडून ट्रेविस हेडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला.

त्याला अभिषेक शर्माने चांगली साथ दिली. या दोघांनी 8 षटकांच्या आतच शतकी सलामी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान, हेडने 20 चेंडूत अर्धशतक केले होते.

अभिषेक 34 धावांवर बाद झाल्यानंतरही हेडने आपली लय कायम ठेवताना चौकार षटकारांची बरसात केली. त्याने 12 व्या षटकात चौकार ठोकत त्याच्या शतकाला गवसणी घातली. हेडने अवघ्या 39 चेंडूत त्याचे शतक केले.

त्यामुळे हे आयपीएल इतिहासातील चौथे सर्वात जलद शतक ठरले, तर 17 व्या हंगामातील सर्वात जलद शतक ठरले आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 साली पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध बेंगळुरूमध्येच 30 चेंडूत शतक ठोकले होते. त्यापाठोपाठ युसूफ पठाण आणि डेव्हिड मिलर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक

  • 30 चेंडू - ख्रिस गेल (विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, बेंगळुरू, 2013)

  • 37 चेंडू - युसूफ पठाण (विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2010)

  • 38 चेंडू - डेव्हिड मिलर (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मोहाली, 2013)

  • 39 चेंडू - ट्रेविस हेड (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, बेंगळुरू, 2024)

  • 42 चेंडू - ऍडम गिलख्रिस्ट (विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2008)

दरम्यान, बेंगळुरुविरुद्धच्या हेडच्या या खेळीमुळे 12 षटकात हैदराबादने 1 बाद 158 धावा केल्या. पण शतकानंतर 13 व्या षटकात हेड बाद झाला. त्याने 41 चेंडूत 102 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले. त्याला लॉकी फर्ग्युसनने फाफ डू प्लेसिसच्या हातून झेलबाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT