Umran Malik delivery hits Mayank Agarwal 
IPL

उमरान मलिकच्या वेगाचा कहर; मयंकला चेंडू लागताच जमिनीवर कोसळला

उमरान मलिकने ओव्हरचा चौथ्या चेंडू 143.2 किमी प्रतितास वेगाने टाकला.

Kiran Mahanavar

Umran Malik IPL 2022: आयपीएल २०२२ लीग मध्ये काल पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला. हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जची फलंदाजी सुरू असताना SHR चा गोलंदाज उमरान मलिकने एक चेंडू असा ठाकला की पंजाब किंग्जच्या कर्णधार मयंक अग्रवालच्या बरगडीला लागला. चेंडू लागताच मयंक अग्रवाल जमिनीवर पडला. त्याला खूप वेदना होत होत्या, त्यामुळे सामना काही वेळ थांबवला होता. चांगली गोष्ट म्हणजे मयंक अग्रवाल पुन्हा उभा राहिला, आणि खेळायला लागला. (Umran Malik delivery hits Mayank Agarwal)

उमरान मलिक हैदराबादसाठी सातव्या षटकात गोंलदाजी करण्यासाठी आला. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल त्याच्यासमोर होता. उमरान मलिकने ओव्हरचा चौथ्या चेंडू 143.2 किमी प्रतितास वेगाने टाकला. मयंक अग्रवालला काही समजता.आणि चेंडू थेट मयंकच्या बरगड्याना लागला. तरीही तो एक धाव काढण्यासाठी धावला. त्यानंतर मयंक थेट जमिनीवरच झोपला. यानंतर फिजिओ मैदानावर आला आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. मयंकला प्रचंड वेदना होत होत्या. औषध घेताच उभा राहून पुन्हा फलंदाजी करायला लागला. या अपघातातून मयंक अग्रवाल सावरू शकला नाही. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 157 धावा केल्या. अभिषेक शर्माने 43 आणि रोमॅरियो शेफर्डने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 29 चेंडू राखून 160 धावा करून लक्ष्य गाठले. इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद 49 आणि शिखर धवनने 39 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT