umran malik | p chidambaram SAKAL
IPL

उमरान नावाचं वादळ येतंय; काँग्रेस नेता झाला क्रिकेटरचा फॅन

उमरानच्या धडकी भरवणाऱ्या वेगाची दहशत संपूर्ण आयपीएलमध्ये पसरली आहे

Kiran Mahanavar

Umran Malik IPL 2022 : जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या आयपीएलच्या (IPL 2022) हंगामात गोलंदाजीने कहर करत आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाच्या गोलंदाजाने बुधवारी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध जोरदार गोलंदाजी करताना 5 विकेट घेतले आहे. उमरानने चालू हंगामात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केले आहे. त्याचे चाहते केवळ क्रिकेट मध्ये राहिले नाही, तर राजकारणीही झाले आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यानंतर आता पी चिदंबरम (P. Chidambaram) उमराणचे चाहते झाले आहे. पी चिदंबरम याने त्याची कौतुक केले आहे.

उमरान मलिक हे एक असं वादळ आहे, जे आपल्या मार्गात येणारे प्रत्येकाला उडवून लावत आहे. त्याचा जबरदस्त वेग, आक्रमकता पाहण्यासारखीच आहे. आजची कामगिरी पाहिल्यानंतर आयपीएलच्या या हंगामातील उमरान मलिक हा सर्वात मोठा शोध ठरणार आहे यात शंका नाही. बीसीसीआयने त्याला विशेष प्रशिक्षक देऊन ताबडतोब टीम इंडियात आणावे. असे पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

याआधी शशी थरूर यांनीही उमरानचे ट्विट करून त्याचे कौतुक केले होते. त्याला टीम इंडियात आणण्याचे सुचवले होते. उमरानने गुजरातविरुद्धच्या सामन्यात 5 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहे. त्याने ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांना आउट केलं होते. उमरानने सामन्यात 4 षटके टाकत 25 धावांत 5 विकेट घेतल्या.

सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने 6 गडी गमावून 195 धावा केल्या. अभिषेक शर्माने 65 आणि एडन मार्करामने 56 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 5 गडी बाद 199 धावा केल्या आणि सामना जिंकला. संघाकडून वृद्धीमान साहाने 38 चेंडूत 68 धावा केल्या. राहुल तेवतिया 21 चेंडूत 40 आणि राशिद खान 11 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT