Hardik Pandya on Ms Dhoni
Hardik Pandya on Ms Dhoni 
IPL

Hardik Pandya: 'मी धोनीसाठी...' पराभवानंतर हार्दिक पांड्याने केलं मोठं विधान; क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण

धनश्री ओतारी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गतविजेत्या संघाचा पराभव केला. या पराभवानंतर निराश न होता पांड्याने धोनीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. (Very happy for MS Dhoni don't mind losing to him Hardik Pandya after CSK beat GT to win IPL 2023)

एमएस धोनीसाठी मी खुप खुश आहे. नशिबात हेच लिहले होते. चांगल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि तो माझ्या ओळखीच्या सर्वात चांगल्या लोकांपैकी एक आहे. देवाने त्यांना पाठिंबा दिला आहे. माझ्याही पाठीशी उभा आहे. पण आज त्याची रात्र होती. अशी भावना पांड्याने यावेळी व्यक्त केली.

त्याच्या या वक्तव्यानंतर गुजरातच्या पराभवापेक्षा पांड्या अधिक चर्चेत आहे. धोनीच्या चाहत्यांच्या मनावर पांड्या राज्य करत आहे.

तसेच, आम्ही मनापासून खेळलो, आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्याचा अभिमान आहे. आमचे एक ब्रीदवाक्य आहे - आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो. मी सबबी काढणार नाही, चेन्नई चांगली खेळली. आम्ही चांगली फलंदाजी केली. यासोबतच पांड्याने यावेळी साई सुदर्शनने कौतुक केले. या स्तरावर इतके चांगले खेळणे सोपे नाही.

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्स राखून पराभव केला. पावसामुळे 15 षटकात 171 धावा चेस करण्याचे टार्गेट धोनीच्या चेन्नईसमोर होते. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईच्या पोरांनी हे शिवधनुष्य पेलले अन् आपल्या लाडक्या थलाला पाचव्या आयपीएल विजेतेपदाचे गोड गिफ्ट दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT