Virat Kohli sakal
IPL

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर टीका केली आहे. या नियमामुळे संघाचा समतोल बिघडतो, असे स्पष्ट मत विराट कोहलीने व्यक्त केले. गेल्या वर्षापासून अमलात आणण्यात आलेल्या इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर टीका केली आहे. या नियमामुळे संघाचा समतोल बिघडतो, असे स्पष्ट मत विराट कोहलीने व्यक्त केले. गेल्या वर्षापासून अमलात आणण्यात आलेल्या इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. हा नियम अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी करत आहे, असे रोहित शर्मा काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता. आता विराटने रोहितप्रमाणेच मत व्यक्त केले आहे. रोहितच्या मताशी आपण सहमत आहोत, या नियमामुळे संघाचा समतोल बिघडतो, असे केवळ मीच नव्हे तर अनेकांचे म्हणणे आहे, असे विराटने सांगितले.

इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे यंदा अधिक धावा होत आहेत. पंजाब संघाने तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक २६२ धावांचे आव्हान आठ चेंडू राखून पार केले होते. हैदराबाद संघाने तर बंगळूरविरुद्ध आयपीएलमधील सर्वाधिक ३ बाद २८७ ही धावसंख्या रचली होती. तसेच यंदा आठ वेळा अडीचशे पार धावा झाल्या आहेत, अशी आकडेवारी विराटने मांडली.

यामध्ये गोलंदाजांची वाईट अवस्था होत आहे. आपल्या प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मारला जाईल, अशी भीती प्रत्येक गोलंदाजाला वाटत आहे. प्रत्येक संघात जसप्रीत बुमरा किंवा राशीद खान यांसारखे गोलंदाज नाहीत, असे विराट म्हणाला. इम्पॅक्ट खेळाडूच्या रूपाने अतिरिक्त फलंदाज संघात असतो. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये बिनधास्तपणे २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करता येते. कारण आठव्या क्रमांकापर्यंत आपल्याकडे फलंदाजी आहे, याची वरच्या क्रमाकांवर प्रत्येक फलंदाजाला जाणीव असते, असे मत विराटने मांडले.

आपण उच्चस्तरीय क्रिकेट खेळत आहोत आणि केवळ एकाच क्षेत्राचे (फलंदाजी) वर्चस्व असणे योग्य नाही. सर्वांना समान संधी मिळणे, समतोल राहाणे हा खेळाचा खरा आत्मा आहे. बॅट आणि बॉलमध्ये समान संघर्ष असायला हवा, असे विराटने सांगितले. इम्पॅक्ट खेळाडूचा हा नियम प्रायोगिक आहे. आयपीएलनंतर होणारी विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलशी संबंधित सर्व प्रमुख घटकांशी आम्ही इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर चर्चा करणार आहोत, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. या नियमाचा पुनर्विचार करणार असल्याचे जय शहा म्हणाले आहेत आणि खेळाचा समतोल राहील असा चांगला निर्णय घेतला जाईल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

फलंदाज म्हणून माझे या नियमाला समर्थन असेल, पण केवळ चौकार आणि षटकार यामुळेच सामने रंगतदार होतात असे नाही. १६० ही धावसंख्याही तुम्ही निर्णायक ठरवता. त्यातही सामन्यातील रंगत अधिक असते.

- विराट कोहली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT