virat kohli and gautam gambhir 2009 player of-the-match-old-emotional-video viral  
IPL

Kohli vs Gambhir IPL 2023: कोहली-गंभीरच्या भांडणानंतर 2009चा 'हा' व्हिडिओ का आला चर्चेत?

01 मे 2023ला विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जे काही घडले ते क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत...

Kiran Mahanavar

Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : 01 मे 2023 मध्ये आयपीएल सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जे काही घडले ते क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या वादामागे नेमकं जबाबदार कोण? यामागे अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत. पण मैदानात जे काही दिसले, त्यातून जंटलमनच्या खेळाची प्रतिमा निश्चितच खराब झाली आहे.

यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या भांडणानंतर 2009 चा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. क्रिकेट चाहत्यांनी 24 डिसेंबर 2009 चा जुना व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. वास्तविक या तारखेला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला होता. त्या दिवशी गौतम गंभीरने नाबाद 150 धावा केल्या, तर विराटने 107 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराटचे हे पहिले वनडे शतक होते.

सामन्यानंतर एक भावनिक क्षण आला. गौतम गंभीरला प्लेअर ऑफ द मॅच किताब देण्यात आला पण त्याने तो किताब विराट कोहलीला देण्याचा निर्णय घेतला. ज्याची त्यावेळी रवी शास्त्री यांनी मॅच प्रेझेंटेशन दरम्यान खूप प्रशंसा केली होती. मॅन ऑफ द मॅच म्हणून विराटला एक लाख रुपये आणि मोबाईल मिळाला होता.

गौतम गंभीरचे त्यामुळे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यानंतर जेव्हा दोघे एकमेकांना भिडले, तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे

Nashik News : नाशिकमध्ये ३९१ गणेश मंडळांना पोलिसांची परवानगी; महापालिकेकडून ४५५ मंडळांना ग्रीन सिग्नल

Saurabh Bhardwaj: भारद्वाज यांच्या निवासस्थानी छापे; बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, ‘आप’कडून टीकास्त्र

Nashik Ganeshotsav 2025 : नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह शिगेला, बाजारपेठा गजबजल्या

R Ashwin Retirement: IPL निवृत्तीनंतर काय करणार अश्विन? परदेशात खेळायचे असेल, तर BCCI चा नियम काय?

SCROLL FOR NEXT