Virat Kohli and Naveen Ul Haq Instagram Story 
IPL

IPL 2023: विराट-RCBचा प्रवास संपला अन् नवीन उल हकने उडवली खिल्ली; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Kiran Mahanavar

Virat Kohli on Naveen Ul Haq Instagram Story : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. मैदानातून सुरू झालेला लखनऊ आणि आरसीबीमधील वाद सोशल मीडियावर सुरूच आहे.

गुजरातकडून लखनऊच्या पराभवाचे अनेक किस्से विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर नवीनने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पराभव आणि विराट कोहलीची आंब्यासोबतची विकेट अशी मजा घेतली होती. आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने नवीनला आणखी एक संधी मिळणार आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गतविजेत्या गुजरातविरुद्ध 198 धावांचा बचाव करण्यात आरसीबी अपयशी ठरला. या पराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीचा पराभव नवीन उल हकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मेम शेअर केला आहे. हा एक टीव्ही अँकर सतत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो. नवीनने आरसीबी किंवा विराटचे नाव लिहिलेले नाही. पण स्टोरी का ठेवली हे त्याच्या मेसेज वरून स्पष्ट होत आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नवीन-उल-हकची स्लेजिंग केली. सामना संपल्यावर खेळाडूंनी हस्तांदोलन केल्यावर नवीन आणि कोहली यांच्यात वाद झाला. यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही बाचाबाची झाली. तेव्हापासून नवीन आणि विराटमध्ये वाद सुरू आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला लखनऊ सुपर जायंट्स आता प्लेऑफमध्ये खेळणार आहे. लखनऊचा सामना 24 मे रोजी चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

​Pune Accident : सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाचा थरार; भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी!

Maharashtra Sarkari Karmachari: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी बेमुदत संपावर; रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात एल्गार!

Satara ZP Politics: सातारा झेडपीच्‍या सत्तासंघर्षात प्रशासन कात्रीत; सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुऱ्यांची पुनरावृत्ती; नियम पाळणार की दबाव झुगारणार?

Horoscope : अक्षय्य तृतीयेनंतर 'या' 4 राशींना होणार धनलाभ; कोर्टकचेरीच्या कामात यश, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

प्रशांत दामलेंचा मराठी कलाकरांसोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT