Faf du Plessis  rcb
IPL

IPL 2022 : विराट कोहलीने केली RCB च्या नव्या कॅप्टनची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे आरसीबीने संघाची कमान

Kiran Mahanavar

RCB New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे आरसीबीने संघाची कमान सोपवली आहे. आयपीएल 2022 मध्ये तो आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. यावेळी मेगा लिलावापूर्वी सीएसकेने त्याला सोडले आणि लिलावात आरसीबीने ७ कोटी रुपयांना आपल्या पारड्यात घेतले.

विराट कोहलीने गेल्या आयपीएल हंगामात जाहीर केले होते की आरसीबीचा कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम असेल. कोहली 2011 पासून आरसीबीचे कर्णधार होता. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली संघ 2016 मध्‍ये लीगचा अंतिम सामना खेळला होता. मात्र ती विजेता पदापासून हुकली.

फाफ डू प्लेसिसला संघाचा कर्णधार बनवल्याची माहिती खुद्द विराट कोहलीने आरसीबीच्या इन्स्टा हँडल वरून दिली. कोहली व्हिडिओमध्ये म्हणाला, 'नव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आम्ही नव्या जोमाने आणि उर्जेने नवीन हंगामात उतरू त्याआधी तुम्हाला सांगतो की फाफ संघाचा नवा कर्णधार असेल.

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 27 मार्च रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करेल. डु प्लेसिसने 115 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. यापैकी संघाने 81 सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 40 पैकी 25 टी-20 सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT