Virat Kohli Vijaykumar Vyshak Sakal
IPL

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Virat Kohli Direct Hit: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराट कोहलीने केलेल्या डायरेक्ट थ्रोने आणि विजयकुमार वैशाखच्या एका अप्रतिम झेलने सर्वांचे लक्ष वेधले.

Pranali Kodre

IPL 2024, RCB vs GT: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा (IPL) 52 वा सामना शनिवारी (4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बेंगळुरूने 4 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात केवळ बेंगळुरूच्या गोलंदाजांना अप्रतिम क्षेत्ररक्षणचाही जोड मिळाली. त्यातही विराट कोहलीच्या डायरेक्ट थ्रोने आणि विजयकुमार वैशाखच्या एका अप्रतिम झेलने सर्वांचे लक्ष वेधले.

या सामन्यात बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा घेत मोहम्मद सिराज आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी मिळून पहिल्या 3 विकेट्स 19 धावातच घेतल्या.

पण त्यानंतर शाहरुख खान आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला होता. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती. त्यामुळे त्यांची जोडी धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच १२ व्या षटकात मिलरला कर्ण शर्माने बाद केले, तर पुढच्याच षटकात विराटने शाहरुखला धावबाद केले.

झाले असे की 13 व्या षटकात विजयकुमार गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाने ऑफ-साईला फटका मारला, त्यावेळी नॉन-स्ट्रायकरला असलेल्या शाहरुख खानने त्याच्यासह चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु तेवतियाने त्याला नकार देत माघारी धाडले, त्याचवेळी विराटने नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टंपवर चेंडू फेकला आणि बेल्स उडवल्या. त्यावेळी शाहरुख क्रिजमध्ये पोहचला नव्हता. त्यामुळे तो 24 चेंडूत 37 धावा करून माघारी परतला. दरम्यान, विराटच्या थ्रोवर कॅमेरॉन ग्रीनने भन्नाट रिऍक्शन दिली.

त्यानंतर यश दयालने टाकलेले 18 वे षटक शानदार ठरले. त्याने राशिद खानला तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले, तर या षटकातील शेवटच्या चेंडूवर राहुल तेवतियाने पुल शॉट खेळला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या पुढच्या बाजूला लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेने गेला.

यावेळी विजयकुमार उजवीकडे धावत आला आणि त्याने सूर मारत दोन्ही हातांनी झेल घेतला. यावेळी खाली पडल्यानंतरही चेंडू हातातून निसटणार नाही, याची त्याने पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे धोकादायक तेवतियाही बाद झाला.

यानंतर अखेरच्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर गुजरातचे शेवटचे तिन्ही फलंदाज बाद झाले. यामध्ये दुसऱ्या चेंडूवर मोहित शर्माला धावबाद करण्यातही विजयकुमारने महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान गुजरातचा डाव 19.3 षटकात 147 धावांवर संपुष्टात आला.

त्यानंतर 148 धावांचे आव्हान बेंगळुरूने 13.4 षटकात 6 बाद 152 धावा करून पूर्ण केला. बेंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 64 धावा केल्या. तसेच विराट कोहलीने 42 धावांची खेळी केली. अखेरीस दिनेश कार्तिकने नाबाद 21 आणि स्वप्निल सिंगने नाबाद 15 धावा केल्या.

गोलंदाजीत बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तसेच गुजरातकडून जोशुआ लिटिलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नूर अहमदने 2 विकेट्सने घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT