Virat Kohli - Sunil Narine Sakal
IPL

Virat Kohli: थांब तुला आऊटच करतो... अन् विराटने केलेली नारायणविरुद्ध बॉलिंगची तयारी; KKR vs RCB सामन्याआधीचा Video व्हायरल

Virat Kohli Video: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याला सुरुवात होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली गोलंदाजीसाठी तयारी करताना दिसला होता, यावेळी तो सुनील नारायणशीही बोलताना दिसला.

Pranali Kodre

Virat Kohli Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होत आहे. रविवारी (21 एप्रिल) होत असलेल्या या सामन्यापूर्वी विराट कोहलीची गमतीशीर बाजूही दिसली आहे.

झाले असे की बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामना सुरु होण्यासाठी काहीच मिनिट बाकी असताना कोलकाताचे सलामीवीर सुनील नारायण आणि फिल सॉल्ट मैदानात येत होते.

यावेळी विराट कोहलीने त्याची कॅप काढून ती अंपायरकडे दिली, जसे की तोच गोलंदाजी करायला जाणार आहे. त्यानंतर त्याने फलंदाजीला येत असलेल्या नारायणला पाहून गमतीने आता तुझा खेळ संपणार असे हावभावही केले.

यानंतर तो नारायणशी मस्तीने काहीतरी बोलतानाही दिसला. त्यानंतर त्याने पुन्हा आपली कॅप घेतली. दरम्यान, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, विराटने गोलंदाजी केली नाही. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली.

बेंगळुरूने या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल केले आहेत. बेंगळुरू संघात या सामन्यातून कॅमेरॉन ग्रीन, मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र,कोलकाता संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. (Virat Kohli Viral Video)

कोलकाता नाईट रायडर्स - फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

  • सब्स्टिट्युट प्लेअरसाठी पर्याय - सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनिष पांडे, वैभव अरोरा, रेहमनुल्लाह गुरबाज

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज

  • सब्स्टिट्युट प्लेअरसाठी पर्याय - सुयश प्रभूदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजय कुमार वैशाख, स्वप्निल सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Crop Loss,: पाण्याअभावी उभ्या केळीच्या बागेवर फिरविला ट्रॅक्टर; अडीच एकरांतील तीन हजार झाडे उद्ध्वस्त; साडेतीन ते चार लाखांचा खर्च मातीमोल

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Diwali Pet Care: फटाक्यांच्या आवाजाने कुत्रे-मांजर घाबरतात? अशी घ्या काळजी; पशुवैद्यांनी सांगितल्या ५ टिप्स

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

SCROLL FOR NEXT