Virat Kohli Vs Gautam Gambhir
Virat Kohli Vs Gautam Gambhir esakal
IPL

Virat Kohli Vs Gautam Gambhir : अखेर दोन दिल्लीकरांचे झाले पॅच अप! दोस्तीच्या हस्तांदोलनासोबतच जादू की झप्पी

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Gautam Gambhir Patch Up Video : आयपीएलच्या गेल्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील शाब्दिक वादावादी सर्वांना आठवत असेल. आजचा आरसीबी आणि केकेआर सामन्यात देखील असंच काहीसं पहायला मिळेल असे वाटत होतं. मात्र आरसीबीचा स्टार विराट कोहली आणि केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर यांनी पॅचअप केलं असून या दोन दिल्लीकर खेळाडूंचा हस्तांदोलन आणि मिठी मारण्याचा व्हिडिओ व्हारल झाला आहे.

गौतम गंभीर हा लखनौ सुपर जांयट्सचा मेंटॉर असताना त्याची आणि विराट कोहलीची गेल्या हंगामात बाचाबाची झाली होती. नवीन उल हक अन् विराटचा वाद झाल्यानंतर गौतम गंभीर त्यामध्ये पडला होता. अन् गंभीर आणि विराट यांच्यात जुंपली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

गौतम गंभीर त्या संपूर्ण हंगामात चांगलाच ट्रोल देखील झाला होता. नंतरच्या काळात विराट अन् गंभीर हे एकमेकांशी जुळवून घेताना दिसले होते. गंभीर देखील लखनौ सोडून केकेआरच्या संघाचा मेंटॉर झाला होता. आज केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यात विराट अन् गंभीरनं आपल्यात आता पॅचअप झाल्याचं दाखवून दिलं.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम आरसीबीला फलंदाजीला पाचारण केलं होतं. आरसीबीने केकेआरसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 83 धावा केल्या होत्या. मात्र इतर फंलदांजाकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. केकेआरकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या केकेआरने पॉवर प्लेमध्ये 85 धावा ठोकून सामना आपल्या बाजूने झुकवला होता. सलामीवीर सुनिल नारायणने 20 चेंडूत 47 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर फिल्प सॉल्टने त्याला 30 धावा करून चांगली साथ दिली होती. सलामी जोडी माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने केकेआरचा विजय सोपा केला.

व्यंकटेश अय्यरने 50 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यरने नाबाद 39 धावा करत केकेआरच्या विजयाची औपचारिकता 17 व्या षटकातच पूर्ण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT