Virat Kohli and Yuzvendra Chahal Viral Video sakal
IPL

RCB Vs RR : सामन्यादरम्यान विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिली थप्पड मारण्याची धमकी? व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli and Yuzvendra Chahal Viral Video : विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि संजू सॅमसनची टीम राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2024 19 वा सामना रंगला होता.

Kiran Mahanavar

Virat Kohli and Yuzvendra Chahal Viral Video : विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि संजू सॅमसनची टीम राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2024 19 वा सामना रंगला होता. राजस्थानने या सामन्यात शानदार विजय मिळवला असून, हा आयपीएलच्या या मोसमातील सलग चौथा विजय आहे.

दुसरीकडे, बेंगळुरूला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले, मात्र तर राजस्थानचा जॉस बटलर सव्वाशेर ठरला. दरम्यान विराट कोहली आणि युझवेंद्र चहल या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली चहलला थप्पड मारण्याची धमकी देताना दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...

आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. बेंगळुरूने सामन्यात 3 गडी गमावून 183 धावा केल्या, जे आरआरने सहज गाठले. या खेळीदरम्यान एक प्रसंग असा आला, कोहलीने चहलकडे पाहत थप्पड मारण्याचे हावभाव केले. युझवेंद्र चहल विराटसमोर गोलंदाजी करत असताना ही घटना घडली.

यादरम्यान, कोहली 92 धावांवर फलंदाजी करत होता, यावेळी त्याने चहलला शानदार षटकार ठोकला. या षटकारासह कोहलीने 98 धावा गाठल्या. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जेव्हा कोहलीने थप्पड मारण्याचे हावभाव केले तेव्हा तो अजिबात हसत नव्हता, यामुळे चाहत्यांना असे वाटले की कोहली चहलवर रागावला आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की कोहली आणि चहल यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.

चहल बेंगळुरूसाठीच खेळायचा, तो बेंगळुरूसाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज होता. या सामन्यापूर्वीही कोहली आणि चहल एकमेकांना भेटले होते. दोघेही एकमेकांसोबत हसताना आणि विनोद करताना दिसले. यावरून हे स्पष्ट होते की कोहलीचे हावभाव हा केवळ विनोद होता, कोहलीने रागातून चहलला थप्पड मारण्याचे हावभाव केले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT