Virat-Kohli-Umran-Malik
Virat-Kohli-Umran-Malik 
IPL

कॅप्टन कोहलीकडून 'जम्मू एक्स्प्रेस' उमरानला मिळालं खास गिफ्ट

विराज भागवत

उमरानने टाकला IPL 2021मधील सर्वात वेगवान चेंडू

Umran Malik in IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद संघाने शेवटच्या टप्प्यात आधीच क्वालिफाय झालेल्या बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचे प्रयत्न ४ धावांनी तोकडे पडले. SRH कडून अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकने पुन्हा एकदा वेगाच्या बळावर साऱ्यांचे लक्ष वेधले. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे प्रभावित होत कर्णधार विराट कोहलीने त्याला एक खास गिफ्ट दिले.

SRHच्या ताफ्यात नेट बॉलर म्हणून जम्मू काश्मीरचा उमरान मलिक खेळत होता. टी नटराजनला कोरोनाची बाधा झाल्याने उमरानला संघात सामील करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला अंतिम ११ मध्येही स्थान देण्यात आले. KKR विरुद्ध पदार्पणातील सामन्यात उमरान मलिकने सर्वांचे लक्ष वेधून घेत ताशी १५१.०३ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. तो यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. RCB विरूद्ध त्याने यात भर घातली. त्याने IPL मध्ये खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने तब्बल ताशी १५३ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. यापूर्वी नवदीप सैनीने ताशी १५२.८५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.

उमरानच्या वेगामुळे रन मशिन विराट कोहलीही प्रभावित झाला. सामना संपल्यावर विराट कोहलीने त्याच्याशी संवाद तर साधलाच. पण त्यासोबत विराटने त्याला आपली स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली. विराटकडून मिळालेल्या हा खास गिफ्टसाठी उमरानने विराटचे आभारही मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT