virat kohli golden duck twitter reaction memes fans rcb vs LSG sports news ipl 2022 sakal
IPL

करिअर संपलं!...किंग कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट; चाहते झाले भावूक

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे नशीब त्याला बऱ्याच दिवसांपासून साथ देत नाही

Kiran Mahanavar

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे नशीब त्याला बऱ्याच दिवसांपासून साथ देत नाही. विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात गोल्डन डकचा बळी ठरला. कोहली लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीचा खराब फॉर्म अनेक दिवसांपासून सुरू आहे. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएलमध्येही दिसायला सुरूवात झाले आहे. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट होऊन हसत पॅव्हेलियनमध्ये जाताना एक्सप्रेशन खूप व्हायरल होत आहे.(Virat Kohli Golden Duck Twitter Reaction)

पहिल्याच चेंडूवर किंग कोहली अशा प्रकारे बाद झाल्याने चाहते खूपच निराश झाले. विराट कोहली सोशल मीडियावर लगेचच नंबर वन ट्रेंड बनला. कोहलीचे फोटो एक्सप्रेशन आणि स्कोअर खूप पटकन व्हायरल झाले.

विराट कोहली बाद झाल्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. ज्यामध्ये एका महिलेने स्टेडियममध्ये आपला चेहरा झाकला होता. तर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. काही चाहत्यांनी लिहिले की, विराट कोहलीला असे पाहून माझं हृदय तुटत आहे. आपल्या राजाची कारकीर्द संपलेली दिसत आहे.(IPL 2022 Virat Kohli Update)

विराट कोहली गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच गोल्डन डकचा बळी ठरला आहे. दुष्मंता चमीराचा चेंडू कोहली पॉइंटच्या दिशेने खेळत असताना झेल बाद झाला. विराट आऊट झाल्यावर थोडावेळ हसला आणि मग पॅव्हेलियनच्या दिशेने चालायला सुरवात केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT