Virat Kohli hinted Through Tweet About Soon Century will Come  ESAKAL
IPL

IPL 2022: कोहलीच्या बॅटमधून लवकरच येणार शतक; ट्विट करून दिला संकेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या काही वर्षापासून शतक (Century) झळकावता आलेले नाही. तो अनेक सामन्यात अर्धशतकी खेळी करून बाद झाला आहे. त्याचे चाहते 71 व्या शतकाची चातकासारखी वाट पाहत आहेत. दरम्यान, विराट कोहलीने आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) सुरू होण्यापूर्वीच आपल्या चाहत्यांना मोठा दिलासा दिला. विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपला हेलमेट काढून बॅट उंचावलेला पाठमोरा फोटो शेअर केला. या फोटोला त्याने 'आता खूप काळ वाट पहावी लागणार नाही.' अशा आशयाचे कॅप्शनही दिले. विराटचा हा आरसीबीच्या किटमधील फोटो आहे.

विराट कोहलीने 2019 च्या आयपीएल हंगामात शेवटचे शतक (Virat Kohli IPL Century) झळकावले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रखडलेल्या 71 व्या शतकाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारताकडून खेळताना विराट कोहलीचे शेवटचे शतक बांगलादेश विरूद्ध ठोकले होते.

  • 24 एप्रिल 2016 गुजरात लायन्स विरूद्ध नाबाद 100 धावा, राजकोट

  • 7 मे 2016 रायजिंग पुणे जायंट विरूद्ध नाबाद 108 धावा, बंगळुरू

  • 14 मे 2016 गुजरात लायन्स विरूद्ध 109 धावांची खेळी, बंगळुरू

  • 18 मे 2016 किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध 113 धावा, बंगळुरू

  • 19 एप्रिल 2019 केकेआर विरूद्ध 100 धावा, कोलकाता

विराट कोहलीने आज केलेल्या ट्विटद्वारे तो यंदाच्या हंगामात शतक ठोकणार असे संकेत दिले आहेत. त्याने या ट्विटमधून शतक ठोकणार असे स्पष्ट सांगितले नसले तरी जो फोटो शेअर केला आहे त्यावरून तो शतकाबाबतच बोलत आहे असे दिसते. विशेष म्हणजे त्याला त्याने 'खूप वाट पहावी लागणार नाही' असे कॅप्शनही दिले आहे. विराट कोहली यंदाचा आयपीएल हंगाम आरसीबीचा कर्णधार म्हणून खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यावर अधिकचा भार नसणार आहे. तो आपल्या बॅटिंकडे अधिक लक्ष केंद्रीत करू शकतो. त्यामुळे या हंगामात नक्कीच त्याच्या बॅटमधून शतक निघू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT