Virat Kohli X/RCBTweets
IPL

Virat Kohli: 'प्लीज मला त्या नावाने बोलावणं बंद करा...' IPL आधी विराटची फॅन्सला विनंती

Virat Kohli: आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमावेळी विराट कोहलीने चाहत्यांसह सर्वांनाच एक खास विनंती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Request to Fans: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी बेंगळुरू संघाचा एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी अनबॉक्स हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमावेळी बेंगळुरूचे महिला आणि पुरुष संघातील खेळाडूही उपस्थित होते. यावेळी बेंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही चाहत्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना विराटने चाहत्यांना सांगितले की त्याला किंग म्हणू नका, त्यामुळे त्याला ओशाळल्यासारखे वाटते.

आरसीबी अनबॉक्स या कार्यक्रमावेळी बेंगळुरू संघाने नवी लोगो आणि संघाच्या नावातील बदलाचीही घोषणा केली. यापूर्वी या संघाचे नाव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असे होते, परंतु आता या संघाचे नाव बदलून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असेल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर संघाच्या नवीन जर्सीही लाँच करण्यात आले. याशिवाय जेव्हा विराटला स्टेजवर बोलवण्यात आले, तेव्हा त्याने आधी चाहत्यांना विनंती केली.

तो स्टेजवर असताना बेंगळुरूचा प्रेझेंटेटर दानिश सैतने बोलायला सुरुवात केली, तेव्हा तो म्हणाला, 'किंगला कसे वाटत आहे?' त्यावर विराट म्हणाला, 'परत येऊन छान वाटत आहे.' यावेळी चाहत्यांनी मोठा गोंधळा घातला.

त्यामुळे विराट काहीवेळ शांत बसला आणि म्हणाला, 'मला बोलू द्या, आम्हाला आज रात्री चेन्नईला जायचे आहे. आम्हाला चार्टर्ड फ्लाईट आहे, त्यामुळे आमच्याकडे फार वेळ नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे मला त्या नावाने (किंग) बोलावणे बंद करा.

'मी आत्ता फाफला तेच सांगत होतो की जेव्हा तुम्ही लोक मला त्या नावाने बोलावता, तेव्हा मला खूप ओशाळल्यासारखे वाटते, मला फक्त विराट म्हणा.'

खरंतर 2014 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर विराटला किंग हे विशेषण वापरल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते. त्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे विशेषण लावण्यात येत आहे.

बेंगलोर संघ पहिल्या सामन्यासाठी चेन्नईला पोहचला आहे. आता त्यांचा पहिला सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याने 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT