Virat Kohli On Retirement sakal
IPL

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Virat Kohli On Retirement: भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli On Retirement: भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. एकीकडे चाहत्यांना कोहलीला मैदानावर खेळताना पाहायचे असते. त्यामुळे चाहत्यांच्या मनात असाही प्रश्न आहे की, विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास काय होईल? आता विराटने एका मुलाखतीदरम्यान निवृत्तीबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला की, मला करिअरमध्ये सर्व काही करायचे आहे जेणेकरून नंतर मला कोणाता पश्चात्ताप होऊ नये.

निवृत्तीबाबत विराट कोहली म्हणाला की, एक खेळाडू म्हणून आमच्या कारकिर्दीलाही शेवटची तारीख आहे. त्यामुळे मला माझ्या संघासाठी मैदानावर दररोज सर्वोत्तम द्यायचे आहे. त्या दिवशी मी हे करायला पाहिजे होते, असा विचार करून मला माझे करिअर संपवायचे नाही.

पुढे तो म्हणाला की, प्रत्येक दिवस सारखा नसतो. माझे काम संपेल आणि मी निघून जाईन, त्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाहीस. काही काम अपूर्ण राहिल्याबद्दल मला पश्चात्ताप करायचा नाही. जोपर्यंत मी खेळतो तोपर्यंत मला माझे सर्वस्व द्यायचे आहे. इथेच विचार करून मी पुढे जातो.

आयपीएल 2024 या हंगामात विराट आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटने 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतकही आहे. यासह विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याचबरोबर विराट कोहली या हंगामात कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी 250 हून अधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. आता विराटची नजर 18 मे रोजी सीएसकेसोबत आरसीबीच्या महत्त्वाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेण्यावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT