Virat Kohli RCB vs KKR 
IPL

IPL 2023 : 'आम्ही हरण्यास पात्र...' सामन्यानंतर विराट कोहली कोणावर रागावला?

RCB च्या पराभवावर विराट कोहली संतापला, म्हणाला...

Kiran Mahanavar

Virat Kohli RCB vs KKR : आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला कोलकाता नाईट रायडर्सकडून आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. 21 धावांनी झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने संघाला फटकारले.

सामन्यानंतर कोहली म्हणाला, त्याच्या संघाने केकेआरला विजय दिला आणि ते हरण्यास पात्र होते. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता संघाने बंगळुरूसमोर विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 179 धावाच करता आल्या. आरसीबीसाठी 50 धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज होता.

सामना संपल्यानंतर कोहली म्हणाला, 'खरं सांगायचं तर आम्ही केकेआरला मॅच गिफ्ट केली. आम्ही हरण्यास पात्र होतो. आम्ही पुरेसा खेळ दाखवला नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली पण क्षेत्ररक्षण दर्जेदार नव्हते. आरसीबीच्या क्षेत्ररक्षकांनी नाइट रायडर्सचा कर्णधार राणाला दोन जीवदान दिले तर रॉयनेही एक झेल सोडला.

कोहली पुढे म्हणाला, आम्ही मैदानात दोन संधी गमावल्या ज्यामुळे आम्हाला 25 ते 30 धावा द्याव्या लागल्या. आम्ही फलंदाजीत चांगल्या स्थितीत होतो, पण नंतर आम्ही 4-5 विकेट सहज गमावल्या. ते विकेट घेणारे चेंडू नव्हते पण आम्ही थेट क्षेत्ररक्षकांच्या हातात फटके मारले. विकेट्स गमावूनही लक्ष्याचा पाठलाग करताना एका भागीदारीने आम्हाला सामन्यात पुनरागमन केले. आम्ही दुसरी चांगली भागीदारी करू शकलो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

Latest Marathi News Update LIVE : अंबरनाथ नगरपालिकेच्या माहितीफलकावर गोंधळ! झाडू चिन्हाचा पक्षनावाविना उल्लेख

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

'सोलापुरातील ॲड. राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ'; न्यायाधीशासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष..

SCROLL FOR NEXT