Virat Kohli And Gautam Gambhir Fight SAKAL
IPL

Virat Kohli : दिसतं तसं नसतं..! गौतम गंभीर सोबतच्या वादावर कोहली पहिल्यांदाच बोलला

Kiran Mahanavar

Virat Kohli And Gautam Gambhir Fight : आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यानंतर लखनौच्या एकना स्टेडियमवर जोरदार भांडण पाहायला मिळाले. दुसऱ्या डावाच्या 17व्या षटकात सुरू झालेली ही बाचाबाची सामन्यानंतर हस्तांदोलनात वाढली. या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेची घोषणाही बोर्डाने केली आहे. आता मैदानावरील या भांडणानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

लखनौ सुपरजायंट्सचा एकना स्टेडियमवर कमी धावसंख्येच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आक्रमक दिसला. सामन्यात त्याची अनेक खेळाडूंशी किरकोळ बाचाबाची पण झाली, जी सामन्याच्या अखेरीस भांडणात बदलली. या फाईट सीनमध्ये अनेक पात्रे असली तरी मध्यभागी विराट कोहली आणि गौतम गंभीर आले.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विराटने एक पोस्टर शेअर केले ज्यामध्ये मेसेज लिहिला होता की, आपण जे काही ऐकतो ते फक्त मत असतं, तथ्य नाही. आपण जे पाहतो तो आपला दृष्टीकोन असतो, पण सत्य काही वेगळेच असते. या प्रतिक्रियांवरून विराटने काल रात्रीच्या घटनेवरच आपली भूमिका ठेवली आहे.

Virat Kohli Instagram story

या संपूर्ण प्रकरणात बीसीसीआयने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. विराट आणि गंभीरला बोर्डाने त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. तर अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक याला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या चुका मान्य केल्या. त्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणीची गरज नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rescue: पुण्यात थरारक रेस्क्यू! दोन महाकाय पाइपमध्ये अडकलेल्या रानगव्याला अखेर जीवनदान; मूक प्राण्यासाठी ‘देवदूत’सिंहगड रस्ता धावले

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकार मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?; जुलैचा तिसरा आठवडा ठरणार महत्वाचा; संभाव्य नावे समोर

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलांबाबत शिवसेना शिंदे गट आक्रमक

Thane News: ठाणे जिल्हा बँकेत शिंदे-चव्हाण यांची चाणक्यनीती यशस्वी; 'परिवर्तन'चा पराभव, 'सहकार'चा झेंडा

Early Breast Cancer Care: अर्ली ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करायचा? तज्ज्ञांनी सांगितले ५ प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT