virat kohli  captaincy rcb
virat kohli captaincy rcb sakal
IPL

Virat Kohli IPL: विराट कोहली पुन्हा बंगळुरुचा कर्णधार होतो तेव्हा...

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्या19 एप्रिल रोजी हंगामाचा 31वा सामना खेळण्यात आला. चाहत्यांचा लाडका विराट कोहली या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे सर्वांची निराशा झाली. पण या सामन्यात असे काही घडले ज्यामुळे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार.(Virat Kohli Stand In Captaincy RCB)

फलंदाजीत अपयशी ठरलेला विराट कोहली पुन्हा एकदा मैदानावर कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 96 धावांची इनिंग खेळल्यानंतर थोडा वेळ ड्रेसिंग रूममध्ये थांबला होता. लखनौ सुपर जायंट्सचा डाव सुरुवात झाले. अशा परिस्थितीत फाफच्या जागी आरसीबीचे नेतृत्व विराट कोहलीने केले. तो काही षटकांसाठी स्टँड-इन-कॅप्टन म्हणून आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला. विराट कोहलीने 2021 मध्येच आरसीबीचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती. काही वेळाने फाफ डू प्लेसिस मैदानात आला आणि त्यानंतर त्याने संघाची कमान हाती घेतली.(IPL 2022 Virat Kohli News)

हंगामाच्या सुरुवातीला आरसीबीला नवीन कर्णधाराच्या शोधात होते. मेगा लिलावात आरसीबीने फाफ डू प्लेसिसला सात कोटी रुपयांना खरेदी केले. संघाने प्लेसिसला कर्णधार म्हणून घोषित केले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात फाफ डू प्लेसिसने 96 धावाची खेळे केले. ज्यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये गोल्डन डकवर आऊट झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT