Virat Kohli Unfollows Sourav Ganguly 
IPL

IPL 2023 : गांगुली-विराट वाद चव्हाट्यावर; कोहलीच्या 'या' निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ

गांगुली आणि विराटमधील कर्णधार वादाची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत

Kiran Mahanavar

Virat Kohli Unfollows Sourav Ganguly : विराट कोहली आणि सौरव गांगुली. भारतीय क्रिकेटचे दोन मोठे दिग्गज आणि दोन माजी कर्णधार. मात्र या दोन दिग्गजांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद जगापासून कधीच लपून राहिलेला नाही. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडला होता. त्या सामन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला.

सामन्यानंतर विराट कोहलीने सर्वांशी हस्तांदोलन केले पण दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीकडे दुर्लक्ष केले. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर गांगुली आणि विराटमधील कर्णधार वादाची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आली. पण आता विराटने असे काही केले आहे ज्यामुळे हे दोन खेळाडू पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

आता हँडशेक प्रकरणानंतर विराट कोहलीने सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचे वृत्त येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार याआधी विराट सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता. मात्र आता या खेळाडूने दादांना त्यांच्या फॉलोलिस्टमधून काढून टाकले आहे.

नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 33 चेंडूत 50 धावा केल्या. तो या सामन्यात खूपच आक्रमक दिसत होता. यानंतर क्षेत्ररक्षणातही तो मोठ्या उर्जेने मैदानात उतरला. आरसीबीच्या गोलंदाजीदरम्यान त्याने सीमारेषेवर अमन खानचा झेल घेताना दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्याकडे पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT