Virat Kohli on Chris Gayle sakal
IPL

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

आयपीएल 2024 ची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चांगली झाली नाही, परंतु अखेरीस बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli on Chris Gayle : आयपीएल 2024 चा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आठवडाभरात विजेत्या संघाचा निर्णय होईल. आरसीबीला पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. आयपीएल 2024 ची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चांगली झाली नाही, परंतु अखेरीस बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

अशा परिस्थितीत आरसीबीच्या करोडो चाहत्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. दरम्यान, आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ख्रिस गेलला पुन्हा आरसीबीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. बेंगळुरू पात्र ठरल्यानंतर आरसीबीचा माजी स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आरसीबीच्या खेळाडूंना भेटण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेला. आणि गेलने सर्व खेळाडूंसोबत फोटो काढले.

दरम्यान, विराट कोहली जेव्हा ख्रिस गेलला भेटला. तेव्हा त्याने ख्रिस गेलला पुन्हा संघात येण्याची ऑफर दिली. विराट कोहलीने गेलला पुढील हंगामात आरसीबीमध्ये परतण्यास सांगितले. विराट म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आला आहे, तुला क्षेत्ररक्षणाचीही गरज नाही, फक्त फलंदाजी करायची. आता ख्रिस गेल खरंच पुढच्या हंगामात बंगळुरूमध्ये परतणार आहे का, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत.

गेल खरंच बंगळुरूला परतणार का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये गेल बेंगळुरूच्या सर्व खेळाडूंना भेटत आहे. दरम्यान, कोहलीने हसत हसत गेलला पुढील हंगामात आरसीबीमध्ये परत येण्यास सांगितले. हा फक्त एक विनोद होता, ज्यावर सर्व खेळाडू हसत होते.

यासोबतच कोहलीने गेलला सांगितले की, या हंगामात त्याने सर्वाधिक षटकार मारले आहेत. यावर गेलने आश्चर्याने विचारले. तर कोहली म्हणाला की मी सर्वाधिक 37 षटकार मारले आहेत. हा व्हिडिओ बेंगळुरूने पात्र ठरल्यानंतरचा आहे.

मात्र, आता पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने 41 षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT