Rohit Sharma | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

Rohit Sharma: पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रोहित शर्मा पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स संघ सोडेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Mumbai Indians: बुधवारी (8 मे) सनरायझर्स हैदराबाद संघाने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 57 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला 10 विकेट्सने पराभूत केले. हा हैदराबादचा सातवा विजय असल्याने त्यांचे आता 14 गुण झाले आहेत.

हैदराबादच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्स मात्र प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतरित्या बाहेर झाले आहेत. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठे भाष्य केले आहे.

पाच वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. आयपीएल 2024 हंगामाच्या सुरुवातीला मुंबईच्या संघात नेतृत्व बदल झाला. मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत ही जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली.

हार्दिकला आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने गुजरात टायटन्सकडून ट्रेडिंगमधून संघात परत घेतले होते. दरम्यान, हा मोठा बदल मुंबईच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. कर्णधार हार्दिक पांड्याही ट्रोल झाला.

यादरम्यान संघात फुट पडल्याच्या चर्चा झाल्या. त्यातच आत मुंबई इंडियन्सवर आयपीएल 2024 प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्की ओढावली.

याचदरम्यान आता स्पोर्ट्सकिडाशी बोलताना वसीम अक्रम म्हणाला, 'मला असं वाटतंय, रोहित पुढीलवर्षी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार नाही. मला त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात पाहायला आवडेल.'

'कल्पना करा तो तिथे सलामीवीर असेल, गौतम गंभीर मेंटॉस आणि श्रेयस अय्यर कर्णधार. ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवर त्यांची मग भक्कम फलंदाजी असेल. रोहित कोणत्याही खेळपट्टीवर शानदार फलंदाजी करू शकतो, तो इतका चांगला खेळाडू आहे. पण त्याला केकेआरमध्ये पाहायला आवडेल.'

मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 असे पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. परंतु, 2020 नंतर संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही, त्यानंतर आता आयपीएल 2024 पूर्वी त्याला संघातून काढण्यात आले.

दरम्यान, या नेतृत्वबदलानंतर मुंबईची यंदाच्या हंगामातील कामगिरीही घसरली आहे. मुंबईला साखळी फेरीतील 12 सामन्यांपैकी आत्तापर्यंत केवळ चार सामनेच जिंकता आले आहेत, तर आठ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे.

त्यामुळे मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी मुंबईला 12 गुणांपर्यंत पोहचता येणार आहे. मात्र 12 गुण त्यांना प्लेऑफमध्ये पोहचवण्यासाठी पुरेसे नसल्याने त्यांना आता या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी वाटोळं केलं', आझाद मैदानात सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेरलं; गाडीवर पाणी बॉटल फेकल्या, VIDEO VIRAL

"या मुलीला मी मनापासून लेक मानलं" प्रियाच्या निधनाच्या बातमीने दिग्दर्शक विजू माने हळहळले; पोस्टमधून कलाकारांची श्रद्धांजली

PM मोदींना जिनपिंग यांनी दिली स्वत:ची कार, पुतीन रशियातून गाडी घेऊन आले पण नंबर प्लेट चीनची

Latest Marathi News Live Updates : आरक्षणासाठी मराठा आंदोलकाचं चिखल मातीत लोटांगण

PKL 2025: ‘टाय-ब्रेकर्स तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, आणि त्यातूनच आम्ही सामना जिंकलो’, यू मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार

SCROLL FOR NEXT