dc vs rr match details sakal
IPL

'चीटर-चीटर'; लाइव्ह मॅचमध्ये अंपायरच्या निर्णयावरुन पब्लिक आक्रमक, पाहा व्हिडिओ

अतिशय रोमांचक सामन्यादरम्यान हाय व्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला.

Kiran Mahanavar

IPL 2022 : आयपीएलच्या 34 व्या सामना (शुक्रवारी) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळला गेला. जो राजस्थान रॉयल्सने (RR) 15 धावांनी जिंकला. या अतिशय रोमांचक सामन्यादरम्यान हाय व्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. त्यानंतर आता सोशल मीडियावर चाहते मैदानावरील पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते वानखेडे स्टेडियमवर चीटर-चीटर घोषणा करताना दिसत आहे.(DC vs RR Match Details)

दिल्ली कॅपिटल्सला सामन्याच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावांची गरज होती. डीसीसाठी रोव्हमन पॉवेल आणि कुलदीप यादव मैदानावर फलंदाजी करत होते. तर राजस्थान रॉयल्ससाठी ओबेड मैकॉय हे षटक टाकण्यासाठी आला होता. रोव्हमन पॉवेलने या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले, पण ओबेड मैकॉयचा तिसरा चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर होता. मात्र असे असतानाही मैदानावरील पंचांनी चेंडूवर नो बॉल दिला नाही.

अंपायरच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या DC कॅप्टनने थेट सामन्यातच आपल्या खेळाडूंना परत बोलावण्याचे संकेत दिले, त्यानंतर पुन्हा एकदा गर्मा गर्मी सामना सुरू झाला. पंच आणि खेळाडूंनी कसेतरी कर्णधाराची समजूत घातली, मात्र तिथे बसलेली जनता पंचांच्या निर्णयाला सतत विरोध करताना दिसली आणि यादरम्यान त्यांनी चीटर-चीटरच्या घोषणाही दिल्या. आता याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

DC ने हा सामना 15 धावांनी हरला, पण जर अंपायरने आपल्या निर्णयाचा विचार केला असता तर सामन्याचा निकाल कुठेतरी बदलू शकला असता. अंपायरच्या निर्णयावर चाहत्यांची नाराजी सोशल मीडियावरही दिसून येत आहे, तर डीसी कर्णधार पंतने थेट सामन्यादरम्यानच आपला विरोध व्यक्त केला आहे. अशा स्थितीत आता बीसीसीआय या घटनेवर पंचांवर काही कारवाई करते की नाही, हे पाहणे योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र हवामान अंदाज! पुढचे काही दिवस पावसाचे सावट; आंबा, काजू बागायतीवर परिणाम, असा असेल अंदाज

Nagpur Child Abuse Case : नागपूर हादरलं! जन्मदात्यांनीच १२ वर्षीय मुलाल साखळीने बांधलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Resume लगेच अपडेट करा! 2026 मध्ये या विभागात निघणार मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Matar Dhokla Recipe: नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा मटार ढोकळा, घरच्यांकडून मिळेल वाहवा!

अग्रलेख - कृष्णेच्या काठाकाठाने

SCROLL FOR NEXT