CSK vs GT IPL 2024 Sameer Rizvi News Marathi 
IPL

CSK vs GT IPL 2024 : 20 वर्षांचा समीर रिझवीने करिअरच्या पहिल्याच बॉलवर राशिद खानला ठोकला षटकार, अन् जिंकले MS धोनीचे मन

Who is Sameer Rizvi : एकीकडे जगातील सर्वात एक नंबर टी-20 गोलंदाज राशिद खान आणि दुसरीकडे आयपीएलमध्ये एकही चेंडू न खेळलेला 20 वर्षीय फलंदाज समीर रिझवी.

Kiran Mahanavar

Who is Sameer Rizvi CSK vs GT IPL 2024 : एकीकडे जगातील सर्वात एक नंबर टी-20 गोलंदाज राशिद खान आणि दुसरीकडे आयपीएलमध्ये एकही चेंडू न खेळलेला 20 वर्षीय फलंदाज समीर रिझवी. जो इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 19व्या षटकात फलंदाजीला आला.

समीर रिझवीची ही डेब्यू इनिंग होती. ज्यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट टी-20 फिरकी गोलंदाज राशिद खान पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आणि सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

या सामन्यात समीर रिझवीलाही प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्याने आयपीएल पदार्पण आणि कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर रशीद खानला षटकार ठोकला. राशिद खानने त्याच्या पायाकडे गुगली बॉल टाकला. पण तो गुडघ्यावर बसला आणि षटकार ठोकला.

त्यानंतर समीर रिझवी इथेच थांबला नाही. रशीदच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर षटकार मारला. या सामन्यात रिझवीने केवळ 14 धावा केल्या, मात्र ज्या पद्धतीने त्याने राशिद खानवर हल्ला चढवला ते पाहून चेन्नई स्टेडियममध्ये बसलेले चाहतेच नाही तर धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसला. धोनीनेही रिझवीसाठी टाळ्या वाजवल्या.

कोण आहे समीर रिझवी?

समीर रिझवीला आयपीएल 2024 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. समीर रिझवी हा यूपीचा खेळाडू असून तो मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

गेल्या वर्षी झालेल्या UP टी-20 लीगमध्ये रिझवीने सर्वाधिक षटकार मारले होते आणि CSK ला ही गोष्ट आवडली होती. रिझवीला चेन्नईच्या मॅच फिनिशरची भूमिका देण्यात आली आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या इनिंगमध्येच दाखवून दिले की हा खेळाडूही त्यात सक्षम आहे. रिझवीसाठी ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात त्याला या स्पर्धेत आणखी संधी मिळतील आणि हा 20 वर्षांचा खेळाडू आपली प्रतिभा दाखवेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : सपा नेते अबू आझमी यांचे गोवंडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT