Yash Thakur | IPL 2024 Sakal
IPL

Yash Thakur: धोनीसारखं व्हायचं होतं, पण बनला फास्ट-बॉलर; कोण आहे गुजरातविरुद्ध 5 विकेट्स घेणारा विदर्भाचा 'यश'?

LSG vs GT, IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सकडून गुजरात टायटन्सविरुद्ध 5 विकेट्स घेणाऱ्या यश ठाकूरबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Who is Yash Thakur?: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत २१ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने ३३ धावांनी विजय मिळवला.

लखनौच्या या विजयात २५ वर्षीय यश ठाकूरने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात ३.५ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, त्याच्या या कामगिरीमुळे तो चर्चेत आला आहे. यश देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. त्याने गेल्या काहीवर्षात विदर्भाकडून शानदार कामगिरी केली असून तो विदर्भाच्या संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे.

वेगवान गोलंदाज असलेल्या यशला क्रिकेटचे आकर्षण वाटले ते २०११ मध्ये. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार यशने एमएस धोनीने वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रभावित केले होते. त्यामुळे त्याने यष्टीरक्षणही करायला सुरुवात केली.

मात्र प्रशिक्षक प्रविण हिंगणीकर यांच्या अकादमीत असताना त्यांनीच त्याला गोलंदाजी करताना चुकून पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याला यष्टीरक्षण सोडून देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्याला सांगितले की धोनीला वेगळ्या स्वरुपात फॉलो कर. त्यांचा सल्ला यशने ऐकला आणि विदर्भाच्या संघातीलच उमेश यादवला त्याने आदर्श बनवले.

हळुहळू यशने गोलंदाजीत आपली प्रतिमा दाखवून दिली. त्याने गेल्या काही वर्षात सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी आणि विजय हजारे वनडे ट्रॉफी या स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

त्याला आयपीएल २०२३ च्या लिलावात लखनौने ४५ लाखांत संघात सामील करून घेतले होते. त्यापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने विदर्भाकडून सर्वाधिक १५ विकेट्स घेतल्या होत्या, तसेच २०२१ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १८ विकेट्स घेतल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेतही विदर्भासाठी यशने चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीत ६ आणि अंतिम फेरीत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्याने त्याच्या कारकिर्दीत २२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ६७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ३७ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ५४ विकेट्स घेतल्या आहेत, तर ४९ टी२० सामन्यांत त्याने ७४ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT