Will Jacks GT vs RCB  esakal
IPL

Will Jacks GT vs RCB : विल जॅक्सने इतिहास रचला! ख्रिस गेलचा 11 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

अनिरुद्ध संकपाळ

Will Jacks IPL Record GT vs RCB IPL 2024 : आरसीबीने गुजरात टायटन्सचा 9 विकेट्स आणि 24 चेंडू राखून मोठा पराभव केला. आरसीबीकडून विल जॅक्सने तुफान फटकेबाजी करत 41 चेंडूत शतकी खेळी केली. त्याला विराट कोहलीने 44 चेंडूत 70 धावा ठोकत चांगली साथ दिली.

सामना सुरू असताना सलामीला आलेला विराट कोहली आज शतक ठोकेल असं वाटत होतं. मात्र 31 चेंडूत 50 धावा करणाऱ्या विल जॅक्सने पुढच्या 10 चेंडूत शतकी मजल मारली. त्यानं आपली ही खेळी 10 षटकार आणि 5 चौकारांनी सजवली. आरसीबीने 201 धावांच टार्गेट 16 षटकातच पार केलं.

विशेष म्हणजे विल जॅक जरी सर्वात वेगवान आयपीएल शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर असला तरी त्यानं 50 ते 100 चा प्रवास 10 चेंडूतच पार केला. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2013 मध्ये ख्रिस गेलने 50 ते 100 धावा 13 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. आता हा विक्रम विल जक्सच्या नावार झाला आहे.

सर्वात वेगवान आयपीएल शतक

  • ख्रिस गेल - 30 चेंडूत शतक - 2013

  • युसूफ पठाण - 37 चेंडूत शतक - 2010

  • डेव्हिड मिलर - 38 चेंडूत शतक - 2013

  • ट्र्रॅविस हेड - 39 चेंडूत शतक - 2024

  • विल ज्रक्स - 41 चेंडूत शतक - 2024

आरसीबीने चेस केलेली सर्वात मोठी धावसंख्या

  • 204 - पंजाब किंग्जविरूद्ध - 2010

  • 201 - गुजरात टायटन्सनविरूद्ध - 2024

  • 192 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरूद्ध - 2016

  • 187 - सनराईजर्स हैदराबादविरूद्ध - 2023

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT