women ipl sakal
IPL

अखेर महिला IPL स्पर्धेला मुहूर्त लागला, BCCI ची मोठी घोषणा

आयपीएलच्या महाकुंभात सध्या महिला आयपीएल खेळवा या मागणिने जोर धरला आहे.

Kiran Mahanavar

Women IPL : आयपीएलच्या महाकुंभात सध्या महिला आयपीएल खेळवा या मागणिने जोर धरला आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) महिला आयपीएलच्या (Women IPL) आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यामध्ये महिला आयपीएल खेळवलं जाण्याची शक्यता आहे, तसंच मार्च महिन्या शक्य झालं नाही तर सप्टेंबर 2023 महिन्याचाही विचार केला जाऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे.(Women IPL Will Start Next Year)

भारतीय महिला टीमच्या चांगल्या कामगिरीनंतर महिला आयपीएल खेळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुरुषांच्या आयपीएलचं 2008 पासून आयोजन होत आहे. पुरुषांच्या आयपीएल 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला गेला. या निर्णायक सामन्यात गुजरात टायटन्स या नव्या संघाने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. आयपीएल 2022 दरम्यान अनेक वर्षांनी महिला आयपीएलची मागणी केल्या गेले, अशा परिस्थितीत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला इंडियन प्रीमियर लीगबाबत खेळवण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात नुकतेच महिला T20 चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्हेलॉसिटी, ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज या तीन संघांनी भाग घेतला होता. सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. सामना पाहण्यासाठी सुमारे साडेआठ हजार प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते. अशा स्थितीत महिला आयपीएलच्या आयोजनाची अपेक्षा आणखी वाढली आहे. महिला आयपीएल 6 संघांसह सुरू होऊ शकते. पुरुषांच्या आयपीएलच्या काही फ्रँचायझींनी महिला संघ खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT