WTC Final Prize Money 2023
WTC Final Prize Money 2023 
IPL

WTC Final Prize Money: भारत चॅम्पियनशिप जिंकल्यास मिळणार 13 कोटी रुपये, पाकिस्तानच्या पदरात किती?

Kiran Mahanavar

ICC World Test Championship Final Prize Money 2023 : पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी जाहीर केले की स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस रक्कम म्हणून $1.6 दशलक्ष (सुमारे 13.21 कोटी) मिळतील. म्हणजे टीम इंडियाला ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर पाकिस्तानलाही पैसे मिळणार आहेत.

9 संघांमध्ये 31 कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम वाटली जाणार आहे, असे आयसीसीने सांगितले. हे असे संघ आहेत ज्यांनी 2021-23 दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भाग घेतला होता. 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ लंडनमधील ओव्हल येथे कसोटी चॅम्पियनशिपचे विजेते बनण्यासाठी आमनेसामने येतील.

जिथे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023 (ICC World Test Championship 2023) विजेत्याला $1.6 दशलक्ष (रु. 13 कोटींपेक्षा जास्त रक्कम) मिळेल. त्याच वेळी उपविजेत्याला $8 लाख (रु. 6.5 कोटी) मिळतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सांगितले की, WTC च्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. WTC च्या 2019-21 सीझनमध्ये जी बक्षीस रक्कम होती तीच यावेळी देखील आहे. अशा स्थितीत त्यात कोणतीही वाढ झालेली दिसत नाही.

2021 मध्ये WTC फायनल न्यूझीलंड आणि भारत यांच्यात साउथॅम्प्टनमध्ये आयोजित करण्यात आली होती. पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला, त्यामुळे सामन्याचा निकाल सहाव्या दिवशी लागला. त्यानंतर न्यूझीलंड संघाने WTC फायनलमध्ये 8 गडी राखून विजय मिळवला.

पाकिस्तानला मिळणार इतकी बक्षीस रक्कम

आयसीसीने सर्व संघांसाठी 31 कोटींहून अधिक रक्कम निश्चित केल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिका या तिसर्‍या क्रमांकाच्या संघाला 3 कोटी 70 लाख ($450,000) पेक्षा जास्त रक्कम मिळेल. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या इंग्लंड संघाला 2.89 कोटी रुपये ($350,000) दिले जातील. पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या श्रीलंकेच्या संघाला 1.65 कोटी रुपये ($200,000) मिळतील.

WTC मध्ये सहाव्या क्रमांकावर न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावर पाकिस्तान, आठव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला 82 लाख रुपये ($100,000) मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT