WTC Final 2023 Prize Money
WTC Final 2023 Prize Money 
IPL

WTC Final 2023 Prize Money: WTC फायनलपूर्वी ICC ची मोठी घोषणा! चॅम्पियन संघाला मिळणार इतके कोटी

Kiran Mahanavar

Prize Money Announced for ICC WTC 2023 : येत्या जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 होणार आहे. लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान हा मोठा सामना खेळवला जाणार आहे.

अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीकडून विजेत्या संघाला देण्यात येणारी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. खुद्द आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर WTC फायनल 2023 साठी भिडतील, ज्यामध्ये विजेत्या संघाने WTC गदा तसेच बक्षीस रक्कम जिंकली. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीतील विजेत्यांना $1.6 दशलक्ष (रु. 13.23 कोटी), तर उपविजेत्या संघाला $800,000 (रु. 6.61 कोटी) दिले जातील.

आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. आयसीसीने सांगितले की, स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही रक्कम 2019-2021 दरम्यान झालेल्या चॅम्पियनशिप सारखीच आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

टीम ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT