wtc final 2023 rohit sharma 
IPL

WTC Final : रोहित शर्मा सावधान! 13 सेकंदाच्या 'या' व्हिडिओमुळे टीम इंडियाचे वाढले टेन्शन

भारताचे सर्व स्टार खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत यादरम्यान...

Kiran Mahanavar

WTC Final Ind vs Aus : रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल असे भारताचे सर्व स्टार खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. हे सर्वजण आयपीएलमध्ये आपापल्या संघांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो टीम इंडियाची झोप उडवून देईल.

आयपीएलनंतर भारताला लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असले तरी ऑस्ट्रेलियाने त्याची तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ कौंटी क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. ससेक्सकडून खेळताना त्याने असा अप्रतिम झेल घेतला की कोणालाही आश्चर्य वाटेल.

ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात सामना खेळल्या जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी रहमान अहमद क्रीजवर होता. रहमान ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या काठावर जाऊन स्लिपच्या दिशेने गेला. चेंडू स्टीव्ह स्मिथपासून खूप दूर होता. त्याने एक हात लांब केला आणि चेंडू पकडण्यासाठी डायव्हिंग केले. स्मिथचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

स्मिथचा हा झेल टीम इंडियाचे टेन्शन वाढवण्यासाठी पुरेसा आहे. 13 सेकंदांचा हा व्हिडिओ दाखवतो की ऑस्ट्रेलियाने आपली तयारी मजबूत केली आहे मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. भारतीय विरोधी संघ सर्व प्रकारे आक्रमण करण्यास सज्ज आहे. अशा स्थितीत भारताला टिकावे लागेल. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नुकताच भारतात कसोटी सामना जिंकला होता. आयपीएलनंतर भारताला तयारीसाठी फारसा वेळ मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT