WTC Final Team India Squad SAKAL
IPL

WTC Final Team India: टीम इंडियात मोठा बदल! सुर्या अन् ऋतुराजची लागली लॉटरी

Kiran Mahanavar

WTC Final Team India Squad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना लंडनमध्ये 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे. या सामन्यासाठी आता टीम इंडियाच्या संघात मोठ्या बदलाची बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाच्या एका वरिष्ठ खेळाडूला दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले. तर दुसरीकडे युवा खेळाडूने लॉटरी जिंकली आहे. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी याबाबत ट्विट करून याबाबत माहिती दिली. याशिवाय बोर्डाने तीन स्टँडबाय खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलच्या जागी ईशान किशनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर मुकेश कुमार, ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे.

खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव बॉर्डर बावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळून बाहेर गेला होता. त्याला एकदिवसीय सामन्यातही लय सापडली नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो फ्लॉप ठरला मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. या दोघांचीही आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली.

आयपीएल 2023 मधील एका सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. राहुलच्या मांडीला दुखापत झाल्याची बातमी आली. यानंतर त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही आपले नाव मागे घेतले. त्याची अधिकृत माहिती देताना बीसीसीआयने आता त्याच्या बदलीची माहिती दिली आहे. त्याचवेळी जयदेव उनाडकटलाही दुखापत झाली असली तरी तो संघात आहे.

WTC फायनलसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.

स्टँडबाय खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT