Yash Dhull Sixer in ICC U19 World Cup Semi Final Against Australia Will May Make Him wealthy In IPL Auction 2022  esakal
IPL

IPL Aucion 2022: हा पठ्ठ्या कोटीत खेळणार, पहा Video

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Mega Aucion 2022) येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएलच्या जुन्या 8 आणि नव्या 2 संघांनी आपली 4 खेळाडूंना रिटेन्शन / कराबद्ध प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर बीसीसीआयने देखील 590 खेळाडूंची शॉर्टलिस्ट प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. आता फ्रेंचायजी कोणत्या खेळाडूला आपल्या गोटात ओढायचे याची रणनीती आखण्यात व्यग्र झाले आहेत. याच दरम्यान, वेस्ट इंडीजमधून एक खेळाडूने या सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले. या खेळाडूचे नाव आहे यश धुल (Yash Dhull).

वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये (ICC U19 World Cup 2022) भारताने ऑस्ट्रेलियालाचा ९६ धावांनी पराभव केला. भारताचा कर्णधार यश धुलने या सामन्यात दैदिप्यमान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर २९० धावा उभारल्या. त्यात कर्णधार यश धुलचा (Yash Dhull Batting) मोठा वाटा होता. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 110 चेंडूत 110 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला.

यशने जरी आपल्या डावात फक्त एकच षटकार (Yash Dhull Six) मारला असला तरी तो त्याने ज्या प्रकारे मारला तो वाखाण्याजोगा होता. त्याने उंचपुऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला पुढे सरसावत षटकार खेचला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ आयसीसीने (ICC) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आगामी आयपीएल लिलावात बऱ्याच फ्रेंचायजी या यश धुलवर बोली लावण्यास सरसावतील यात शंका नाही. त्यामुळे त्याची बेस प्राईस जरी 20 लाख असली तरी तो कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT